राज्य सरकारने विकास कामाला भरिव निधी दिल्याने रखडलेल्या कामाची पुर्तता पुर्ण झाली – आमदार नामदेव ससाणे ६०० कोटीवर निधी कामाचे भूमिपुजन संपन्न

youtube

राज्य सरकारने विकास कामाला भरिव निधी दिल्याने रखडलेल्या कामाची पुर्तता पुर्ण झाली – आमदार नामदेव ससाणे ६०० कोटीवर निधी कामाचे भूमिपुजन संपन्न

विडुळ –

विदर्भ मराठवाडा जोडणाऱ्या
पुलाची नव्याने निर्मिती करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे दळणवळण सोपे व सुलभतेने सुरू होण्यासाठी उमरखेड – महागाव विधानसभेचे आमदार यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेले ६०० कोटी चे निधीद्वारे सिमेंट काँक्रेट रस्ते नाल्या पुल कामाचे भूमिपूजन १५ ऑक्टोंबर रोजी विडुळ येथील देवसरी टी पॉइंट येथे येथे आमदार नामदेव ससाने यांचे हस्ते संपन्न झाले राज्यसरकारने वंचित विकास कामांना चालना मिळावी म्हणून भरिव निधी उपलब्ध करून दिल्याने उमरखेड तालुक्यातील रखडत पडलेल्या कांमाना विकासात्मक गती देऊ शकलो असे संबोधीत करते वेळी आमदार नामदेव ससाने म्हणाले
भूमिपुजन कार्यक्रम प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवराचा यावेळी सन्मान करण्यात आला
केलेल्या विकास कामाचे बाबत मत मंचावर व्यक्त करताना भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी असे सांगितले कि आमदार नामदेव ससाणे यांच्या अथक परिश्रमाणे सहाशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला तेंव्हा दुर्गम बंदी भागातील असो शहरी भागातील असो गावाचा चेहरा मोहरा बदलनार आहे आणि हे जसे शब्द दिले तसे आम्ही वचनही पूर्ण केले असे देखील नितीन भुतडा यांनी विशेष आवर्जून सांगितले बंदी भागाकडे जर पाहायला गेलं तिथं डांबरीकरणाचा रस्ता हा दृष्टीनेही दिसत नाही पण आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने निधी खेचून आणता व वन विभागाच्या परवानग्या देखील प्राप्त करून घेण्यात आला व ग्रामीण भागामध्ये सिमेंट रस्ते नाल्या बंधारे सगळ्यासाठी उमरखेड तालुक्यातील ढाणकी बंदी भाग भागासाठी ६०० कोटीचा निधी आणला व विकास कामे हे पूर्णत्वास लावले असे हि या वेळी सांगितले
विकास कामे भूमिपुजन प्रसंगी यावेळी मंचावर आमदार नामदेव ससाने , चितंगराव कदम , नितीन भुतडा , किसनराव वानखेडे , शैलेश मुंगे , ॲड आदित्य माने, सविता पाचकोरे , महेश पिंपरवार , रोहित वर्मा , अतुल खंदारे , बळवंत नाईक , सुधाकर लोमटे , दिगंबर वानखेडे आदी भाजप चे पक्ष पदाअधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad
Google Ad

1 thought on “राज्य सरकारने विकास कामाला भरिव निधी दिल्याने रखडलेल्या कामाची पुर्तता पुर्ण झाली – आमदार नामदेव ससाणे ६०० कोटीवर निधी कामाचे भूमिपुजन संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!