नामदेव ससाने यांनी अतिदुर्गम अशा आदिवासी भागात जाऊन जागतिक आदिवासी दिवस साजरा.

नामदेव ससाने यांनी अतिदुर्गम अशा आदिवासी भागात जाऊन जागतिक आदिवासी दिवस साजरा
उमरखेड – भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वोच्च पदी सर्वसामान्य भारतीय विराजमान झाला पाहीजे या संकल्पनेतून भारताच्या राष्ट्रपतीपदी अतिदुर्ग अशा आदिवासी समाजाच्या श्रीमती द्रौपदीची मुर्मु यांना राष्ट्रपतीपदी विराजमान करून एक इतिहास घडवित दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्यां आदिवासी समाजाला न्याय देण्याचे कार्य केले आहे हीच आदरणीय मोदी प्रेरणा घेऊन उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनी आज कोर्टा येथे अतिदुर्गम भागात जात आदिवासी बंधूं सोबत जागतिक आदिवासी दिन साजरा केला याप्रसंगी आमदार ससाने यांच्या नेतृत्वात गावातील समस्त आदिवासी लोकांनी राष्ट्रपती श्रीमती द्रोपदीजी मुर्मु यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत,आदिवासी वाद्यवृदाच्या गजरात समस्त आदिवासी बांधवांनी हर्षोल्हासात द्रौपदीजी मुर्मु ह्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याबद्दल आदरणीय मोदी साहेब यांचे आभार मानत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने श्यामभाऊ जाधव,योगेशजी वाजपेयी, उद्धल जाधव, अंकुश राठोड,कृष्णा खराटे,जयवंत पोटे,नरसाजी शिदनवाड ,हरी किरवले, तुकाराम शिरडे, संभा पोटे, तुकाराम शिरडे, लक्ष्मण डांगे ,संभा शिरडे उदयभान पीटलेवाड, सदाशिव शिंदे, उत्तम खंदारे, माधव माहुरे, चिंतामण बर्गे ,पांडुरंग खुडे ,जयवंत रणमले, देविदास बोंबले, विश्वनाथ किरवले, बबन जाधव,समस्त कोरटावाशीय उपस्थित होते. यावेळी आमदार ससाने यांचे कडून ग्रा प कार्यालय कोर्टा व ग्रामस्थांना राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु यांच्या प्रतिमा वाटप करण्यात आले.