आरक्षणासाठी प्रकाश पाटील देवसरकर यांनी दिला राजीनामा.
आरक्षणासाठी प्रकाश पाटील देवसरकर यांनी दिला राजीनामा
उमरखेड
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा व सदस्यत्वाचा काम करणार नाही असे पत्र आज 27 रोजी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटवले यांना पाठविले त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे राज्यात बहुसंख्येने असलेला मराठा समाजाचे अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी आहे मूळ संख्या मराठा समाज अल्फा भूधारक असल्याने समाजाची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे त्यामुळे शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे ही मागणी सातत्याने होत आहे परंतु सरकारकडून चालढकल होत असल्याने समाज बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे जोपर्यंत मराठाला समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाचे सदस्याचा पदाचा काम करणार नाही पहिले आरक्षण पक्ष नंतर ही भूमिका घेत अशा आशयाचे पत्र माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी नाना पटोले यांना पाठवण्यात आले