उमरखेड – महागाव विधानसभेत दोनशे रोहित्र दया   आमदार नामदेव ससानेंची आढावा बैठकीत मागणी.

youtube

उमरखेड – महागाव विधानसभेत दोनशे रोहित्र दया 
 आमदार नामदेव ससानेंची आढावा बैठकीत मागणी 

प्रतिनिधी
उमरखेड :

उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघात जवळपास दोनशे रोहित्राची गरज असून विज समस्यां सोडविण्यासाठी हे गरजेचे असल्याने दोनशे रोहित्र त्वरीत दया ! अशी मागणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत श्री विश्वासजी पाठक संचालक, मरावीम मुंबई यांना आमदार नामदेव ससाने यांनी केली आहे .
या आढावा बैठकीला पालकमंत्री संजय राठोड , जिल्हाधिकारी आशिया , आमदार अशोक उईके , आमदार संजीव बोदकुरवार , आमदार नामदेव ससाने , मुख्यकार्यकारी अधिकारी मौनक घोष , सीई , आरडिसी व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
आमदार ससाने बैठकीत म्हणाले की ,
माझा उमरखेड – महागाव मतदार संघ हा अनुसूचित जाती करिता
राखीव असून माझे मतदारसंघात आंध , आदिवासी त्याचप्रमाणे बंजारा या दोन जाती दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या आहेत .त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैनगंगा अभयारण्याचा परिसर पसरलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहेत. त्या सोबतच शेतकऱ्यांना एजी पंपाची दिलेली लाईन ही मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड आहे. त्यामुळे जंगल भागातील कास्तकारांना नियमित वीज मिळत नाही. शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन पिकाचे संरक्षण करीत ओलीत करावे लागते. पण ट्रांसफार्मर ओव्हरलोड असल्यामुळे शेतातील पिकांना पुरेशे व्यवस्थित पाणी मिळत नाही. त्यासोबतच रात्री बेरात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बऱ्याच वेळा वन्यप्राण्यांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे.

शेतकऱ्यांचे हाल थांबवण्याचे दृष्टिकोनातून ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर वरील लोड कमी करणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता उमरखेड महागाव तालुक्यात उपकेंद्रांची निर्मिती करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना विजेची सुविधा मिळणे करिता २०० ट्रांसफार्मर उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली .

चौकट :
आमदाराच्या या मागणीमुळे जर उमरखेड व महागाव तालुक्यासाठी रोहित्र मंजूर झाले तर शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. विशेषतः पैनगंगा अभयारण्यातील शेतकऱ्यांना ,कारण विज रात्री – बेरात्री उपलब्ध राहते त्यामुळे शेतीत रात्रीला पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आमदारांची हि रास्त मागणी आहे .
दिलिप बामन्या जाधव
शेतकरी , दराटी ता उमरखेड

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!