गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन, नांदेड द्वारा संचलित फिरते एंडोस्कोपी रुग्णालय “एंडोस्कोपी आपल्या दारी” हा भारत देशातला तिसरा उपक्रम

youtube

गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन, नांदेड द्वारा संचलित फिरते एंडोस्कोपी रुग्णालय “एंडोस्कोपी आपल्या दारी” हा भारत देशातला तिसरा उपक्रम

उमरखेड, –

नंबर कॅम्प 58 जिल्हा यवतमाळ येथे नगरपरिषदेच्या आवारात एकूण २३ रुग्णांची एंडोस्कोपी करण्यात आली.
या कॅम्पचे उदघाटन उमरखेड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्री महेश जामनोर, श्री हॉस्पिटल चे फिजिशियन डॉ विवेक पत्रे , उमरखेड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ आशिष उगले, जेष्ठ डॉ. टी पी माने आणि डॉक्टर्स असोसिएशन उमरखेडचे मान्यवर डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ विवेक पत्रे आणि श्री तौहीद शेख यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले
एकूण २३ पैकी १ रुग्णास जठरात मोठ्या प्रमाणात अल्सर्स आढळून आली, १ रुग्ण HBsAg positive निघाला.
यावेळी या फिरत्या व्हॅनमध्ये वय वर्षे ८३ असणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. एस ए सूर्यवंशी सरांची देखील एंडोस्कोपी करण्यात आली हे विशेष.
मुळव्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रवर्य श्री अजय झरकर यांनी ग्रामगीता भेट दिली
हा उपक्रम चालविण्यासाठी-
बस ,पेट्रोल जनरेटर एंडोस्कोपी टेक्निशियन्स ,पॅथोलॉजी टेकनिशियन ड्रायव्हर्स एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर
आणि बाकी सुविधा घेऊन आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी माहूर आणि किनवट येथे न चुकता नियमित येत असतो. त्याचबरोबर जनरल अवेरनेससाठी जिल्ह्याच्या आणि परिसरातील इतर तालुके व मोठ्या गावांमध्ये एकदा तरी जाण्याचा प्रयत्न करीत असतो.
भारत देशातील शेवटच्या नागरिकाला उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळावी हा आमचा उद्देश. आपण या परिसरातील जास्तीत जास्त लोकांना या सुविधेचा लाभ मिळावा या साठी ही माहिती पोचविण्यास मदत करावी ही विनंती डॉ जोशी यांनी सांगितले

Google Ad
Google Ad

3 thoughts on “गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन, नांदेड द्वारा संचलित फिरते एंडोस्कोपी रुग्णालय “एंडोस्कोपी आपल्या दारी” हा भारत देशातला तिसरा उपक्रम

  1. Appreciating thhe dedicatioon youu putt into your bblog and in depth information you offer.
    It’s nice too come acroiss a blog every onbce in a while hat isn’t the saame unwannted
    rehashed material. Fantzstic read! I’ve bookmarked yor sjte and
    I’m inncluding ykur RSS fees to myy Google account.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!