खासदार राजीव सातव यांना सर्व पक्षीय कार्यकरते कडुन श्रध्दांजली.
खासदार राजीव सातव यांना बरडशेवाळा बामणी फाटा परीसरात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली….
बरडशेवाळा ता.१५
सविता चंद्रे
खासदार राजीव सातव यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती वा-यासारखी पसरताच हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा बामणी फाटा पळसा मनाठा चिंचगव्हान पिंपरखेड नेवरी नेवरवाडी उंचाडा सह सर्व परीसरात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी बामणी फाटा येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.खासदार राजीव सातव यांनी कळमनुरी मतदार संघातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करीत हिंगोली लोकसभा मतदार संघात नेतृत्व करीत असताना मराठवाड्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली असल्याने त्यांना चाहणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हिंगोली लोकसभा चे खासदार असताना परीसरातील अनेक विकासकामे करीत अनेक कार्यक्रत्याची फौज तयार केली होती.त्यांचे दिल्ली दरबारी वजन असल्याने छोटे-मोठे कामांना प्राधान्य देत असत मराठवाड्यातील एक खंबीर नेतृत्व हरपले असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डिंगाबर साखरे, इस्माईल पिंजारी, बालाजी वायकुळे, धनगर समाज युवा मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर दहीभाते, कैलास आडे, प्रेम मस्के, भगवान कवडीकर, सुरज गंडाफळे,दत्ता आनेराव , शिवाजी आनेराव , आंनदराव मस्के , संतोष धरमुरे , अक्षय आनेराव , विशाल आनेराव , बरडशेवाळा येथे सरपंच ज्ञानेश्वर मस्के, पोलिस पाटील दत्तात्रय मस्के, सुभाषराव मस्के,राजु नाईक, दत्तराव नाईक, रामेश्वर मस्के, भावेश मस्के, योगेश मस्के, अभीषेक मस्के, यज्ञवल्की मस्के,गोवींद मस्के,कपील नाईक यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.