मुंबईच्या बैठकीत उमरखेड विधानसभेतील विद्युत समस्या निकाली उमरखेड

youtube

मुंबईच्या बैठकीत उमरखेड विधानसभेतील विद्युत समस्या निकाली

उमरखेड

उमरखेड व महागाव तालुक्यातील शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिक, व्यवसायिक यांना महावितरण प्रणालीच्या अल्प दाबामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने काल दिनांक ३० रोजी मुंबई स्थित एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या सभागृहामध्ये उर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे_समवेत उमरखेड_महागाव तालुक्यातील विद्युत विभागा संदर्भातील अडचणी सोडविण्याकरिता बैठक पार पडली.
बैठकी दरम्यान ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचेशी खालील २० मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
१) फुलसावंगी ता.महागाव येथे १३२ व ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर करणे.२) उमरखेड येथील MIDC मध्ये ३३ केव्ही स्वतंत्र उपकेंद्र मंजूर करणे.३) कुपटी (मरसुळ) ता.उमरखेड येथे ३३/११ केव्ही नविन उपकेंद्र मंजूर करणे.
४) कोर्टा ता.उमरखेड येथे ३३/११ केव्ही नविन उपकेंद्र मंजूर करणे.५) दराटी ता.उमरखेड येथे३३/११ केव्ही नविन उपकेंद्र मंजूर करणे.
६) काळी (टेम्भी) ता.महागाव येथे ३३/११ केव्ही नविन उपकेंद्र मंजूर करणे.७) पेढी ता.महागाव येथे ३३/११ केव्ही नविन उपकेंद्र मंजूर करणे.८) उमरखेड उपकेंद्र ३३/११ केव्ही येथे वाढीव 10 MVA चे क्षमता वाढ (पावर ट्रान्सफार्मर) देणे.९) महागाव व फुलसावंगी ३३/११ केव्ही येथे 3.15 MVA ऐवजी 5 MVA क्षमता वाढ (पावर ट्रान्सफार्मर) देणे.
१०) पोफाळी ता.उमरखेड ३३/११ केव्ही येथे 3.15 MVA ऐवजी 5 MVA क्षमता वाढ (पावर ट्रान्सफार्मर) देणे.११) तिवडी फाटा, बिटर‌गाव, मुळावा ता.उमरखेड ३३/११ केव्ही येथे 5 MVA चे अतिरीक्त क्षमता वाढ (पावर ट्रान्सफार्मर) देणे.१२) सवना ता.महागाव ३३/११ केव्ही येथे 5 MVA चे अतिरीक्त क्षमता वाढ (पावर ट्रान्सफार्मर) देणे.१३) उमरखेड-महागाव मतदार संघातील अभियंत्यांची १० रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे. ( याबाबत मंत्री महोदयांनी मुख्य अभियंता, अमरावती यांना बैठकी दरम्यानच आदेशीत केले आहे.)
१४) उमरखेड-महागाव मतदार संघातील रस्त्याच्या बाजुच्या विद्युत खांबांची उंची रस्त्याच्या कामामुळे कमी झाली असल्याने ती नविन विद्युत खांब टाकून वाढविणे.१५) दररोजच्या रोटेशनसाठी ५० नविन १00 KVAचे रोहीत्र देणे.१६) अतिभारीत रोहित्र (AG-शेतकऱ्यांचे रोहित्र DP) च्या ठिकाणी १०० नग १०० KVA चे नविन रोहीत्र/DP पुरवीण्यात यावे.१७) मुडाणा ता.महागाव येथे नविन शाखा कार्यालय मंजुर करण्यात यावे.१८) उमरखेड येथे महावितरणचा नविन विभाग मंजुर करण्यात यावा. ( पुसद व्यतिरिक्त नविन विभागीय कार्यालय)१९) उमरखेड शहरामध्ये उमरखेड शहर १ व शहर २ आशा दोन शाखा मंजूर करण्यात याव्या.२०) उमरखेड शहरातील विद्युत अपघात टाळण्याहेतूने मुख्य रस्त्यावरील विद्युत लाईन अंडर ग्राउंड करणे (भुयारी मार्गाने करणे).आदि मागण्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी उमरखेड-महागाव मतदारसंघातील विजेशी निगडित समस्या गांभीर्यपूर्वक समजून घेत सकारात्मकतेने सर्व मागण्या तात्काळ मान्य केल्या व त्या लवकरच कार्यान्वित करण्या संबंधीच्या सूचना संबंधित विभागास बैठकी दरम्यान दिल्या.यामुळे उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामिण व शहरी भागातील विद्युत विभागा संदर्भातील सर्वच समस्या संपुष्टात येऊन सर्वांना विद्युत पुरवठ्याच्या अनियमिततेतून सुटका मिळणार आहे.
यावेळी आ किसनराव वानखेडे भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला (भाप्रसे), महावितरण व महापारेषणचे राज्यस्तर, विभागीय स्तरावरील सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

चौकट

आज मुंबई येथे एमएसईबी होल्डिंग कम्पणीच्या सभागृहात ऊर्जा राज्यमंत्री सौ.मेघनाताई बोर्डीकर यांचे समवेत पार पडलेल्या बैठकीमध्ये उमरखेड, महागाव दोन्ही तालुक्यातील विजे संदर्भातील समस्यावर विस्तृत चर्चा झाली. तसेच महावितरण विभागाशी संबंधित आम्ही मांडलेल्या बहुतांश मागण्या मंत्री महोदयांनी मंजूर केल्या असून त्या येत्या वर्षभरात पूर्णत्वास जातील.
नितीन भुतडा
भाजपा, यवतमाळ- पुसद जिल्हा समन्वयक

Google Ad
Google Ad

2 thoughts on “मुंबईच्या बैठकीत उमरखेड विधानसभेतील विद्युत समस्या निकाली उमरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!