हिमायनगर शहरातील बसस्थानकात अल्पवयीन युवकाचा खून

youtube

हिमायतनगर शहरातील बस स्थानकात नव तरुण युवकाचा खून
आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी केले जेरबंद,एक जण गंभीर जखमी.

हिमायतनगर ..
शहरातील बस स्थानकात दोन शाळकरी विद्यार्थयांन मध्ये एक मोठा वाद निर्माण झाला तो वाद शेवटी जीवावर बेतल्याची खळबळ जनक घटना आज दि 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12.35 मी ला घडली या घटनेचे सविस्तर चित्रीकरण हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या सी. सी.टिव्ही मध्ये कैद झाले आहे त्यामुळे सर्व तालुक्यातील पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

तालुक्यातील कार्ला पि. येथील मयत यश उत्तम मिराशे वय 17 वर्ष हे हिमायतनगर शहरात शिक्षण घेण्यासाठी दररोज यायचा पण आज दी.11 सप्टेंबर रोजी बस स्थानकात आरोपी अनुज पवणेकर यांच्याशी त्यांचा किरकोळ वाद झालं असल्याचे उपस्थितांन कडून कळले त्यानंतर अनुज ने यश यांच्यावर धार धार शस्त्राने वार करून यश मिराशे यांच्या छातीत वार केला त्यानंतर हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या सहकार्यास सुद्धा आरोपीने त्याच शस्त्राने मारले व नंतर तो मौजे बोरी च्या दिशेने पसार झाला होता त्यानंतर उपस्थितांनी मयत यश मिराषे व गंभीर जखमी असलेल्या सोहन ला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले यावेळी उपस्थित डॉक्टरांनी असे सांगितले की यश उत्तम मीराशे यांचा मृत्यू झाला व सोहन चायल यांच्या वर पुढील उपचार सुरू आहे हा सर्व प्रकार शहरातील जागरूक देवस्थान श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट च्या सी सी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे यावेळी या सर्व घटनेची विचारपूस करण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे भेट देऊन मयत नव तरुण युवकांच्या नाते वाईकांशी चर्चा केली व पुलिस प्रशासनास आरोपीवर कडक कार्यवाही करण्याचे सांगितले त्यानंतर हिमायतनगर पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक परसराम देवकत्ते व बिट जमादार हेमंत चोले हे करीत आहेत

 

चौकट
ह्या घटने मागील सत्य अद्याप कळाले नाही व या घटनेची प्रक्रिया हिमायतनगर शहरातील पोलीस स्टेशन मध्ये सुरू असल्याचे आरोपीवर कोणता गुन्हा दाखल झाला हे अद्याप कळू शकले नाही

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!