चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून धक्कादायक घटना.

youtube

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून

पती व दिरास अटक सासरा सासू व जाउ फरार

हदगाव

हदगाव तालुक्यातील मरडगा
येथील संजय दत्तराव काळे यांचा विवाह 1 वर्षापूर्वी सगुना उर्फ गायत्री तिच्यासोबत झाला होता त्यांनी आपल्या पत्नीवर संशय घेत मारहाणीत मृत्यू झाला हादगाव पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल मरडगा येथील संजय दत्तराव काळे यांच्यासोबत सगुना उर्फ गायत्री हिचा विवाह दिनांक 04/08/ 2020 रोजी साध्या पद्धतीने पार पडला होता हा विवाह सगुणा उर्फ गायत्री चे मामा रामदास बबनराव अवचार राहणार भौसी यांनी साध्या पद्धतीने विवाह केला होता तो विवाह रीतीरिवाजा प्रमाणे सर्व काही केले होते पण संजय दत्तराव काळे यांचा या अगोदर एक विवाह झाला होता त्या विवाहातून त्यांना घटस्फोट सुद्धा मिळाला होता गायत्री सोबत त्यांचा हा दुसरा विवाह होता तो आपल्या पत्नी वर नेहमी संशय घेत असे व तुझ्या मामा कडून पैसे घेऊन ये वारंवार तगादा लावत असेल हे सर्व प्रकार सगुन उर्फ गायत्री हिने नागपंचमी सणाच्या निमित्ताने आपल्या मामाच्या गावी आल्यानंतर आपल्या मामाच्या कानावर हा सर्व प्रकार घातला व मी पुन्हा सासरी जाणार नाही असे सुद्धा सांगितले त्यामुळे मामाने विचार करून माझी भाची तुमच्याकडे पाठवणार नाही आसा फोन संजयच्या वडिलांना केला नंतर संजयच्या वडिलांनी आपल्या छोट्या मुलाचा सासरा मधुकर पांडुरंग अवचार यांना मध्यस्ती करण्याचे सांगितले व त्यांच्या मध्यस्थीने राखी पौर्णिमा झाल्यानंतर पाठवणी केली त्यानंतर दिनांक 11/09 /2021 रोजी सकाळी 08 वाजता गायत्रीच्या सासऱ्याने फोन केला व तुमची भाची सगुणा उर्फ गायत्री हे चक्कर येऊन पडली आहे आम्ही तिला बाळापुर येथे सरकारी दवाखाना आणत आहोत तुम्ही लवकर या असा फोन आला मी लगेच बाळापुर कडे निघालो व सरकारी दवाखाना येथे येऊन तेथील डॉक्टराकडे विचारपूस केली असता डॉक्टर यांनी सगुना उर्फ गायत्रीच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे असे सांगितले असता दवाखान्यांमध्ये हजर असणारे पत्ती सासरा दीर यांनी तिथून निघून गेले आम्ही नंतर सगुना उर्फ गायत्रीची याची उत्तरय तपासणी करून प्रेत घेऊन गेलो व हदगाव येथील पोलीस स्टेशन मध्ये रीतसर गुन्हा दाखल केला त्यामुळे हादगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या निरीक्षणाखाली पोलीस उपनिरीक्षक फोलाने यांनी गुन्हा दाखल करून तात्काळ पती व दिरास अटक केली सासरा सासू व जाऊ असे तीन आरोपी फरार आहेत

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!