उमरखेड येथे लताजी व बप्पी लहरीना संगीतमय आदरांजली.

उमरखेड येथे स्व. लताजी व बप्पी लहरींना संगीतमय आदरांजली…!
“संगीतातील पर्वाला दिली संगीतमय स्वरांजली.”
उमरखेड, प्रतिनिधी
संगीत क्षेत्रातील एक सुरेल पर्व म्हणून जनमाणसाच्या गळ्यातील ताईत बनलेल्या लता मंगेशकर तसेच संगीताचा बादशहा म्हणून प्रचलित असलेले बप्पी लहरी यांना उमरखेड येथे संगीतमय आदरांजली अर्पन करण्यात आली असून संगीत क्षेत्रातील या निष्कलंक पर्वांना संगीतमय स्वरांजली अर्पन करताना येथील वातावरण अत्यंत भावनिक व संगीतमय झाल्याचे दिसून आले.
दि. २६ फेब्रुवारी रोजी सायं. साडेसहाच्या सुमारास उमरखेड येथील औदुंबर जेष्ठ नागरीक सभागृहात जिजाऊ ब्रिगेडचे सरोज देशमुख ,प्रकाश दुधेवार मा.जि.शिक्षण सभापती यांच्यासह अभि. दत्ता गंगासागर, सरोज देशमुख आदींच्या कल्पक आयोजनातून सदरचा संगीतमय स्वरांजलीचा कार्यक्रम पार पडला. गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे भारतीय संगीतातील योगदान तसेच आपल्या कल्पक व नाविण्यपुर्ण संगीताने डिस्को किंग तथा गायक म्हणून अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली देवून त्यांच्या संगीतातील योगदानास उजाळा मिळावा यासाठी त्यांच्या कारकीर्दीतील काही निवडक गीते गाऊन त्यांना संगीतमय स्वरांजली देण्यात आली. .
यासाठी उमरखेड शहरातील संगीतप्रेमी म्हणून प्रचलित असलेले संजय मुटकूळे यांच्या “रिदम म्युझिक कला मंच” द्वारे या सांस्कृतीक व संगीतमय स्वरांजली अर्पित केली. यावेळी लताजींनी गायलेले ‘ईश्वर सत्य है…’ यासह ‘मेरी आवाज ही पहचान है’, ….’गर याद रहे’ आदी युगलगीते गायक संजय मुटकुळे व पार्श्वगायिका माधुरी देशमुख यांनी अत्यंत मधूर आवाजात सादर केले. तर ‘आदमी मुसाफिर है….’, ‘जिंदगी प्यार का गीत है….’, ‘ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भरलो पानी…’शीशा हो या दील हो..रैना बीती जाए…. इत्यादी लताजींनी गायलेली गाणी ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. तर बप्पी लहरी यांचे ‘याद आ रहा है तेरा प्यार…’, व इतर गाणी गाऊन बप्पीदाच्या गाण्यांना उजाळा देण्यात आला. शेवटी “अखेरचा हा तुला दंडवत” हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली… दरम्यान शेवटच्या गाण्यातील स्वरांनी उपस्थित रसिक श्रोत्यांचे डोळे अक्षरश: पाणावले असल्याची प्रचिती आली…
यावेळी ‘रिदम म्युझिक ग्रुप उमरखेड च्या वतीने संजय मुटकुळे व त्यांची कन्या कु.आचल मुटकुळे यांच्यासह मारुती कळणे, श्रीकांत शहा, साधना श्रीपदवार, माधुरी देशमुख यांच्या आवाजातील जादू उपस्थितांनी अनुभवली..
कार्यक्रमाचे निवेदन सुरेश वाघ व श्री. आर.डी. शिंदे यांनी, कार्यक्रमाचे संगीत संयोजन रिदम म्युझिक ग्रुप यांनी, तर ऑर्गन वादक सुरेश गायकवाड हिंगोली, संतोष हदगावकर, ऑक्टोपॅड सचिन पवार, राजेश जाधव, तबला वादन गणेश इंगोले यांनी सांभाळले….तर कार्यक्रमास विशेष सहकार्य म्हणून औदुंबर जेष्ठ नागरिक मंडळ व पतंजली समिती यांनी केले. यावेळी उमरखेड शहरातील सर्व मान्यवर मंडळीसह महिलांनीही या कार्यक्रमास विशेष हजेरी लावली…
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.