नगर परिषद आरोग्य विभाग निवेदित झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीवर व चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर तत्काळ कारवाई करा – राज्यमंत्री बच्चू कडू.

youtube

उमरखेड नगर परिषद आरोग्य विभागाच्या निविदेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी वर चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर तात्काळ कार्यवाही करा :- राज्य मंत्री बच्चु कडु

राज्यमंत्री बच्चू कडू यांचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना पत्र

उमरखेड
नगर परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत काढण्यात आलेली निविदा क्रमांक 107/ 2018 -19 भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी गजानन मोहळे यांना दिलेल्या नियमबाह्य ,त्रुटीयुक्त, बेकायदेशीर ,कंत्राट व त्या अनुषंगाने झालेल्या अपहार झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व कार्यवाही करिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी सातत्याने २ वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला.या वर जिल्हा सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन यांच्या मार्फत त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती .
पालिकेच्या आरोग्य विभागा अंतर्गत महाराष्ट्र शासन स्वयंरोजगार विभाग निर्णय क्रमांका नुसार सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थांना बळकट करण्याच्या दृष्टीने अटी व शर्ती पूर्ण केल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येत असे नमूद केले होते. शहरातील न . प .मधील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचा दबावाखाली येऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करून दीनदयाळ उपाध्याय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे प्रमाणपत्र निबंधक कार्यालयाने रद्द केले .तरी सुद्धा निविदेतील नियम धाब्यावर बसून अटी व शर्थी पूर्ण होत नसताना रद्द झालेल्या संस्थेचे प्रमाणपत्र जोडून भाजप सक्रिय कार्यकर्ते गजानन मोहळे यांनी ही निविदा बेकायदेशीर रित्या मिळविली होती.
विशेष म्हणजे अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या संस्थेला डावलून ह्या कंत्राटदारास काम देण्यात आले होते. या निविदेस मिळवण्यासाठी खोटे कागदपत्रे जोडून सदर कामात मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार राहुल मोहितवार यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली होती. व सतत या प्रकरणाचा गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरिता एक समिती नेमून सदर समितीद्वारे सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी मागणी करत आमरण उपोषण ही करण्यात आले होते.
सदरील प्रकरणाचा सततचा पाठपुरावा लक्षात घेऊन व आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी त्रिसदस्यीय समिती नेमून सदर प्रकरणाच्या चौकशी समितीने पंधरा दिवसात अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हा सह आयुक्त धीरज गोहाड
यांनी सदर समितीचे अध्यक्ष उमरखेड उपविभागीय अधिकारी , समितीचे सदस्य ,सचिव पुसद नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सदर समितीची सदस्य स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता नगर परिषद पुसद यांना देण्यात आले होते. या त्रिसदस्यीय चौकशी समिती समोर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सुनावणी झाल्यानंतर सदर प्रकरणातील चौकशी अहवाल हा माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे चौकशी समितीमार्फत पाठविण्यात आला त्रिसदस्यीय चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर तात्काळ कार्यवाही करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यवतमाळ यांना राज्याचे राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिले आहे.

-:चौकट:-
विकास कामांच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा लवकरच भांडाफोड-मोहितवार
नगर परिषद सत्ताधार्‍यांनी मतदारांच्या विश्वासाचा घात करत विकास कामांच्या नावावर जनतेच्या पैशाची लूट चालवली आहे . हे लवकरच उमरखेड शहरातील जनतेच्या समोर येईल मा. जिल्हाधिकारी साहेब चौकशी समितीच्या अहवालावर लवकरच पारदर्शक, निपक्षपाती आदेश पारित करतील.त्यामुळे विकास कामांच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा भांडाफोड होईल असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी केले.

Google Ad
Google Ad

1 thought on “नगर परिषद आरोग्य विभाग निवेदित झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीवर व चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर तत्काळ कारवाई करा – राज्यमंत्री बच्चू कडू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!