जि. प .सदस्य चितंगराव कदम यांच्या नेतृत्वात नागापूर ग्रा.प.ने पटकविला द्वितीय पुरस्कार.

youtube

जि.प.सदस्य चितांगराव कदम यांच्या नेतृत्वात नागापुर ग्रा.पं. ने पटकाविला द्वितीय पुरस्कार…!

‘स्वच्छ ग्राम अभियानातून विभागीय स्तरावर रोवला झेंडा…’

 

नागापुर….
जि.प.सदस्य चितंगराव कदम यांच्या नेतृत्वात उमरखेड तालुक्यातील मौजे नागापुर ग्रा.पं. ने विभागीय स्तरापर्यंत उत्तुंग कामगीरी करून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१९-२० च्या विभागीय स्तरावरील स्पर्धेत अमरावती विभागात दुसरा क्रमांक पटकावला असून नागापुर ग्रा.पं. बरोबरच येथील विकासकामांत मोलाची भुमिका बजावणारे जि.प. सदस्य कदम यांच्यावरही सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे आपल्या नाविण्यपुर्ण व कल्पक विकासशैलीने सुपरिचित असलेले जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावचा विकास साधण्यात हतखंडा आहे. गावातील शाळेच्या कार्यालयाबरोबरच स्वछतागृहे, संगणकीय प्रयोगशाळा, अंगणवाड्या, पाणीपुरवठा, शैक्षणिक साहित्य, परिसर स्वच्छता, व्यायाम शाळा, सौर ऊर्जेवरील उपकरणे तसेच लोकसहभागातून त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमातून नागापूर ग्रामपंचायतीच्या विकासातील ते सर्वेसर्वा असल्याची अनुभुती अनेकवेळा विकासप्रेमींना आली आहे. तर
कदम यांच्या कल्पक कार्यप्रणालीची चर्चा नेहमीच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात असते हे देखील जगजाहिर आहे.
दरम्यान चितांगराव कदम यांच्या प्रयत्नाने नागापूरला “स्मार्ट ग्राम पंचायत कार्यालयाचा” प्रयोग अफाट यशस्वी झाला. तर गावातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याची विल्हेवाट, शोष खड्डे, पिण्याचे पाणी, शौचालय वापर, कर वसुली, बचत गट व त्यांच्यामार्फत होत असलेले कार्ये, कंपोस्ट खते निर्मिती प्रकल्प, ग्रामपंचायतचे अभिलेखे, नविन सुसज्ज अंगणवाडी, आर.ओ.चे पाणी, गुरांचे गोठे आदींची स्वच्छता राखून गाव आदर्श ग्राम निर्माण करावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी गावकऱ्यांना वेळोवळी आवाहनाबरोबरच प्रसंगी मार्गदर्शनही केले. त्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत वैयक्तिक, परिसर स्वच्छतेसह आरोग्य व शिक्षण यां प्रमुख बाबींना प्राधान्यक्रम देऊन गावाला सुजलाम-सुफलाम बनविण्यास सहभाग नोंदविला.
तथापि महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत’ “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत” अमरावती विभागाच्या विभागस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागांतर्गत निवड केलेल्या एकूण दहा गावांतून उमरखेड तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीसह कुंभारी ता.कळंब या गावांचा पारितोषिक विजेत्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला असून या गावांची स्वच्छतेची प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती मार्फत काही दिवसांपूर्वी एका चमूने पाहणी देखील केली होती. दरम्यान स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये अमरावती विभागांमधील विभागस्तरीय स्पर्धेमध्ये गावाला मिळणाऱ्या पुरस्काराच्या नामांकनासाठी नागापुर (प) चा समावेश झाल्यानंतर विभागीय चमुने गावातील उपक्रम व विकास कामांची पाहणी करून पुरस्कार प्राप्त गावांची यादी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या मार्फत जाहीर झाली असून यात नागापूर (प.) या गावाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याची घोषणा करण्यात आली. विभागीय स्तरावर गावाला मिळालेल्या या बहुमानाबद्दल जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांच्यासह माजी सभापती सौ. सविता चितांगराव कदम, सरपंच रामा ठेंगे, उपसरपंच गोदाजी जाधव व सर्व गावकऱ्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

“विशेष म्हणजे यापुर्वीही मौजे नागापूर ( प.) ग्रामपंचायतला विविध पुरस्कार प्राप्त झाले असून २००१-०२ मध्ये चितांगराव कदम सरपंच असताना नागापूर ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यावेळी तत्कालिन पालकमंत्री ना. रोहिदास पाटील यांनी नागापूर येथे प्रत्यक्ष येऊन प्रशस्तीपत्र व बहुमान दिला होता. तर सन २००८-०९ मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार, २०१७ -१८ मध्ये स्मार्ट ग्राम तालुकास्तरीय पुरस्कार, सोबतच महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, जिल्हा परिषद शाळेला साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार, अंगणवाडीला सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी पुरस्कार, पर्यावरण ग्रामसमृद्धी पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानीत होणारी नागापुर (प.) ग्रामपंचायत तालुक्यातील एकमेव असून मागील २५ वर्षापासून गावाच्या विकासासाठी गावातील नागरिकांचे सातत्यपुर्ण सहकार्य व श्रमदानामुळे नागापुर (प.) ग्रामपंचायतला पुरस्कार मिळाला असल्याची भावना जि. प. सदस्य चितांगराव कदम यांनी नारीशक्ती न्युज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केली आहे…

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!