संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात नागापूर ग्राम पंचायत सहभाग.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात नागापूर ग्राम पंचायत सहभाग
मुळावा ….
स्मार्ट ग्रामपंचायतला नागापूर प.ता.उमरखेडजि. यवतमाळ ला सन १९-२० चा अमरावती विभागीय पातळीवरचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज द्वितीय पुरस्कार यावर्षी मिळाला त्यामुळे आता नागापूर ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होणार आहे त्याचे मुल्यमापन करण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागातील टीम ८. १०. २०२२ ला नागापूर ग्रामपंचायतीला येणार आहे त्यानिमित्ताने आज ग्रामपंचायतीला पुर्व नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मा.जि. प . सदस्य चितांगराव कदम सर, श्रीमती सविता कदम माजी सभापती पं. स. उमरखेड,श्री.सतिश दर्शनवाड साहेब गटशिक्षणाधिकारी पं. स. उमरखेड, श्री.मधुकर मुंडे साहेब विस्तार अधिकारी पंचायत पं. स. उमरखेड, श्री. पांडुरंग खांडरे साहेब विस्तार अधिकारी शिक्षण पं. स. उमरखेड, श्री. सोनटक्के साहेब मंडळ अधिकारी कॄषी विभाग उमरखेड, श्री. मुसणे कॄषिसेवक कॄषिविभाग उमरखेड, श्री. डॉ. नरवाडे साहेब पशुसंवर्धन विभाग पं. स. उमरखेड, श्रीमती माखणे मॅडम पटवारी तहसील विभाग, श्रीमती राऊत मॅडम A. N. M. आरोग्य विभाग P. H. C.मुळावा, श्रीमती श्री पाईकराव मॅडम सुपरवायझर महिला व बालकल्याण विभाग पं. स. उमरखेड, श्री. प्रकाश शिंदे मुख्याध्यापक उच्च प्राथमिक शाळा नागापूर, श्री.रामा ठेंगे सरपंच, श्री. गुलाबराव गोरे साहेब ग्रामविकास अधिकारी,श्री. गोदाजी जाधव उपसरपंच, मारोतराव कदम पोलिस पाटील, श्री.गुलाब महाराज आडे अध्यक्ष म. गांधी तंटामुक्त समिती, श्री. डॉ. अंबादास कदम अध्यक्ष पर्यावरण समिती, श्री नाजू आडे या. अध्यक्ष शा. व्य. समिती. श्री. पवार सर, श्रीमती चाकोरे मॅडम , श्रीमती कोकणे मॅडम,गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. घुले सर तर आभार प्रदर्शन श्री. डॉ. चव्हाण सर यांनी केले कार्यक्रमाला गावातील व पुरुष उपस्थित होते.
Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.