आमदार ससाने यांच्या हस्ते रुडे नगर येथे भूमिपूजन सोहळा संपन्न . उमरखेड :

youtube

आमदार ससाने यांच्या हस्ते रुडे नगर येथे भूमिपूजन सोहळा संपन्न .

उमरखेड :
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर दहा कोटी रुपयांचा निधी मधून नगरपरिषद अंतर्गत येथील गुलाबसिंग रुडे नगर येथे दि 25 रोजी सकाळी 9 वाजता सिमेन्ट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार नामदेव ससाने तर मंचावर उपस्थितीत सेवानिवृत्त उपपोलीस अधीक्षक विजय रुडे , माजी नप सभापती दिलीप सुरते ,भाजपा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार ,VJNT सेलचे प्रदेश सचिव सुरेश काळे ,बंडोपंत चव्हाण,माजी नगरसेवक शैलेश मुंगे .अतुल खंदारे ,गजानन मोहळे, इंजिनिअर सोहेल शेख, हिरासिंग राठोड ,माजी नगरसेवक सैय्यद अफसर ,ॲड जितेन्द्र पवार , महेश काळेश्वरकर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी आमदार नामदेव ससाने यांनी बोलताना आत्तापर्यंत येथील लोकांचा फक्त मतदानासाठीच वापर केला यांच्याकडे जाणीवपूर्वक मागील सरकारने दुर्लक्ष केले असून ज्यावेळी मोदी सरकार आली तेव्हापासून आम्ही विकास कामे करण्याचा निर्णय घेतला असून रुडे नगर सह शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले . या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून नितीन भुतडा यांनी बोलताना रुडे नगर येथील होणारा रस्ता अतिशय सुंदर टिकाऊ मजबुत पुढील पन्नास वर्षे टिकेल असा रस्ता निर्माण केला जात आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे तसेच पुढे बोलताना तरुणांना रोजगार व येथील विविध समस्या विषयी तथा येथील नागरिकांच्या घरकुल याविषयी नगरपरिषदेकडून तात्काळ मार्गी लावू असे सांगितले .
यावेळी गुलाबसिंग रुडे नगर येथील रमेश ताजवे , रामदास रुडे , प्रदीप शेरे, दीपक ताजवे ,धीरज ताजवे, नामदेव सगणे ,दारासिंग माधवसिंग रुडे, सुरेश गुलाबसिंग रुडे ,कपिल शेरे ,चंदन काळे ,रवी रुडे ,योगेश रुडे ,विनोद चव्हाण ,नरेश रुडे, निरंजन चव्हाण, साजन रुडे ,दारासिंग रामसिंग रूडे, विक्रम रुडे , ओमप्रकाश ताजवे, महेन्द्र चव्हाण , महेश रुडे, सुजल ताजवे यांनी भूमिपूजन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश काळे यांनी केले सूत्रसंचालन शैलेश ताजवे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बंडोपंत चव्हाण यांनी केले यावेळी शेकडो महिला व पुरुष कार्यक्रमाला उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

1 thought on “आमदार ससाने यांच्या हस्ते रुडे नगर येथे भूमिपूजन सोहळा संपन्न . उमरखेड :

  1. This site is incredible. The splendid material shows the creator’s devotion. I’m dumbfounded and anticipate further such amazing substance.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!