नंददीप फाउंडेशन ने दिला बादशहाला मदतीचा हात.

youtube

खऱ्या बादशहाचे अतोनात हाल

नंददीप फाउंडेशन ने दिला बादशहाला मदतीचा हात

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी या बादशहाची कथा आहे.गर्भ श्रीमंत कुटुंबातील हा एक तरुण युवक,त्याच्या मनावर मानसिक आघात झाल्यामुळे तो मनोरोगी झाला.त्यातच त्याचे घरदार सुटले.कुटुंबातील कोणीही त्याचा सांभाळ करण्यास तयार न झाल्यामुळे तो घराबाहेर पडला. अशातच गाव,शहर ,तालुका, जिल्हा असा प्रवास करत करत तो राळेगाव तालुक्यात येऊन पोहोचला.मागील चार ते पाच वर्षापासून तो राळेगाव तालुक्यात वावरत होता.दिवसभर कुठेही फिरणे,बडबड करणे,कुणालाही जेवन मागणे,हा त्याचा नित्यक्रम होता.काळवंडलेला चेहरा,वाढलेली दाढी,लांबलचक केस,फाटलेले कपडे हा त्याचा पेहराव. राळेगावातील समाजमन बादशाह करता कळवळत होत. परंतु काय करावे हे त्यांना कळेना. ते नेहमी त्याला जेवण द्यायचे.अशातच राळेगावचे समाजसेवक स्वप्नील काळसर्पे यांच्या दर्शनास तो पडला.त्यांनी लगेच नंदादीप फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना याबाबत माहिती दिली.तो मनोरुग्न असल्याची कळताच रात्री ११.०० वाजता मनोज बागवाले, संजय वगारे,संजय बोरगांवकर,अक्षय बानोरे,निशांत सायरे,अजय नाटकर,अमोल ही नंदादीप फाऊंडेशन ची टिम राळेगाव येथे पोहोचली. व तिथे अमोल पंडित व अंकित बोटरे यांच्या मदतीने त्या मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात आले. राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या मनोरुग्णाची नोंद करून त्याला नंदादीप फाउंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठान,बेगर मनोरुग्न निवारा केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिशय हलाखीचे जीवन जगत असलेला बादशहाला आता संदीप शिंदे नवसंजीवनी देणार आहेत.संदीप बाबाराव शिंदे यांनी आजवर शेकडो मनोरुग्णांना आपल्या निवारा केंद्रावर आश्रय दिला आहे. यामध्ये परराज्यातील बऱ्याच मनोरुग्णांचा समावेश आहेत.

बाॅक्स
राळेगावातील काहींचे असे म्हणने आहे की,बादशाह ला ढाब्यावर जेवन मोफत आहे.त्याचे कुटुंबातील ट्रक व्यावसायिक आहेत.व परराज्यातून येणारे ट्रकचालक बादशाहाला मालक म्हणून त्यांच्या पाया पडतात,असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.राळेगावातील जनतेच्या मते,बादशाह हा एक चांगल्या कुटुंबातील व्यक्ती असून फक्त मानसिक रोगी असल्यामुळे त्याचे हे हाल होत आहे.

 

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!