अ.भा.महात्मा फुले -समता परिषदेची नांदेड जिल्हा आढावा बैठक संपन्न.

youtube

अ.भा.महात्मा फुले समता परिषदेची नांदेड जिल्हा आढावा बैठक संपन्न.

श्रीक्षेञ माहूर -सुरेखा तळनकर

आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी ओबीसीचे आरक्षण परत मिळविण्यासाठी जिल्ह्यातील ओबीसी वर्गातिल सर्व नागरिकांनी रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी करावी तसेच अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात संघटन अधिक मजबूत करुण ओबीसी वर्गासाठी लढा देऊ असे प्रतिपादन अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुनिल बेहेरे यांनी केले.

दि.२८ एप्रील २०२२ रोजी नांदेड येथील विश्राम गृहात नांदेड जिल्हा समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. जिल्हा अध्यक्ष सुनील बेहेरे यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना.छगन भुजबळ यांचे स्वीय साहाय्यक रवी सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एॅड. सुभाष राऊत, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश संतोष वीरकर, प्रदेश प्रचारक महाराष्ट्र मकरंद सावे, विभागीय अध्यक्ष मराठवाडा डॉ जांबूतकर, जिल्हा अध्यक्षा हिंगोली वैशालिताई गुंजकर, महिला अध्यक्षा नांदेड यांचेसह सखाराम शीतळे ,नारायण अंबुरे,गोरखनाथ राऊत,संघरत्न गायकवाड,अनिल धामणे,बाळू राऊत,अभिषेक लुटे,रवि बेहेरे,शिरीष बेहेरे,सचिन बेहेरे माहूरकर ,ललित क्षीरसागर,वसंत मोरे,यांच्यासह बहुसंख समता सैनिक उपस्तीत होते,संपन्न झालेल्या बैठकीस एॅड.सुभाष राऊत,संतोष विरकर, मकरंद सावे यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हातील तालुका अध्यक्षाची नियुक्ती करुण मान्यवराच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामध्ये मुखेड ता.अध्यक्षपदी हनुमंत सोंदारे,अर्धापूर दीपक अंबुरे,नांदेड ता.संजय मेटकर,मुदखेड बाळू राऊत यांचा समावेश आहे.या बैठकीचे प्रस्ताविक सुनील बेहेरे यांनी केले तर सूत्र संचलन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले असून आभार धोत्रे यांनी मानले.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “अ.भा.महात्मा फुले -समता परिषदेची नांदेड जिल्हा आढावा बैठक संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!