सिंदगी येथील अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई. मंडळ अधिकारी सुरोशे यांचे धाडसत्र सरुच

youtube

सिंदगी येथील अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई.

मंडळ अधिकारी सुरोशे यांचे धाडसत्र सरुच

उमरखेड :- विविध प्रकारच्या बांधकामासाठी रेती आवश्यक आहे तसेच सद्या खूप मोठ्या प्रमाणात घरकुल मंजुर झालेली आहेत. परंतु सद्या शासनाने रेती डेपो देखील सुरू केलेला नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही वाळू तस्करी करणारे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी सरसावले असून लोकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसै घेवून रेती विकल्या जात आहे आणि आर्थिक लूट केल्या जात आहे. यामुळे या अवैध रेती वाहतूकीला आळा घालण्यासाठी आता महसूल प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून महसूल प्रशासन खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करतांना दिसत आहे. उमरखेड महसूल विभागातील मंडळ अधिकारी श्री. गजानन सुरोशे यांनी तर वाळुमाफियांना पळती भुई थोडी करुन सोडली आहे. त्यांचेबरोबर मंडळ अधिकारी प्रकाश माने, पंजाब सानप हे देखील धडाकेबाज कामे करीत आहेत. एकामागून एक असे अनेक जनांवर कारवाई करण्यात येत आहे. याचप्रमाणे मौजे सिदंगी येथील पैनगंगा नदी पात्रातील रेतीचे विनापरवाना उत्खनन व वाहतूक करणारे टॅक्टर दि. १९/३/२०२५ रोजी रात्री ९:३०वाजता मौजे ब्राम्हणगाव येथे पकडून तहसिल कार्यालय उमरखेड येथे पुढील दंडात्मक कार्यवाही करीता लावण्यात आले आहे. सदरची कार्यवाही उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार श्री. राजु सुरडकर यांचे मार्गदर्शनात मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, प्रकाश माने, ग्राम महसुल अधिकारी पंजाब सानप व वाहन चालक धम्मपाल कांबळे यांनी केली आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!