वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला – नितीन भुतडा; यांच्याहस्ते खासदार हेमंत पाटील वक्तृत्वस्पर्धेचे उद्घाटन*राजश्री हेमंत पाटील यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण.
वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला – नितीन भुतडा; यांच्याहस्ते खासदार हेमंत पाटील वक्तृत्वस्पर्धेचे उद्घाटन*राजश्री हेमंत पाटील यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण
उमरखेड, ः कोरोना काळापासून शाळा – महाविद्यालयातील स्पर्धा कमी झाल्या. मुले अभ्यासाला लागली तरी, मुलांना अभ्यासा व्यतिरिक्त देखील व्यक्त व्हायचे असते. मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावणाऱ्या स्पर्धेत खंड पडला आहे. परंतु खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या वक्तृत्व स्पर्धेने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावल्याचे दिसून येत आहे. असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख नितीन भुतडा यांनी येथे केले.
खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.नऊ) उमरखेड येथील श्रीराम मंगलकार्यात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख म्हणून गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, माजी सरपंच संघटनेच्या अध्यक्ष सविता कदम, महिला उद्योजिका आशा कलाने, नरेंद्र पाटील, कृष्णा जाधव, बालाजी धुमाळे, धीरज पवार, संतोष कलाने, शैलेश ताजवे, रंजना पवार, सुरेश पांचाळ यांची उपस्थिती होती.
यावेळी गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील बोलताना म्हणाल्या की, खासदार हेमंत पाटील नेहमीच समाजभिमुख कार्यक्रम राबविण्यावर सर्वाधिक प्राधान्य देतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन अतिशय विचारपूर्वक या वक्तृत्वस्पर्धेचे आयोजन केले आहे. आतापर्यंत हिंगोली, कळमनुरी, हदगाव या तीन विधानसभा मतदार संघात अतिशय उत्साहात वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांकडुन या स्पर्धेस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. परंतु पुढील वर्षी या स्पर्धेतील स्पर्धकांची संख्या दुप्पटीने वाढावी यासाठी मतदार संघनिहाय वक्तृत्वस्पर्धेची कार्यशाळा घेण्याचा माणस असल्याचे राजश्री पाटील म्हणाल्या.
खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातुन कर्तुत्ववाण, नेत्रत्वगुण संपन्न असा उद्याचा लोकप्रतिनिधी उदयास आला पाहिजे असा आशावाद राजश्री पाटील यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून महेश अचिंतलवार, स्वाती दळवी, आशिष साडेगावकर यांनी परिक्षण केले. राष्ट्रपाल सरोदे यांनी सुत्रसंचालन केले, गोदावरी अर्बन संस्थेचे उमरखेडचे शाखा व्यवस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले, जनसंपर्क अधिकारी चंद्रसेन आढागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर सहाय्यक व्यवस्थापक राहुल देशपांडे, निखील शुक्ला, रितेश गिरी, सावंत लांडगे, प्रवीण आढागळे, राहुल आढागळे, निकेश विनकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
शनिवार (दि. दहा) महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय गोकुंदा- किनवट, सोमवार (दि.१२) मुक्ताई सभागृह लिटल किग्ज इंग्लीश स्कुल असेगाव रोड – वसमत.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://accounts.binance.com/vi/register?ref=WTOZ531Y