राजकारण विसरून ढाणकीचा चा पाणीची समस्या सोडवणार व विकास करणार : नगराध्यक्षा सौ.अर्चना सुंदरकांता वासमवार नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न; भाजपला रोखण्यासाठी ‘नगर विकास आघाडी’ची वज्रमूठ

youtube

राजकारण विसरून ढाणकीयेथील पाण्याची समस्या सोडवणार व विकास करणार : नगराध्यक्षा सौ.अर्चना सुंदरकांता वासमवार

नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न; भाजपला रोखण्यासाठी ‘नगर विकास आघाडी’ची वज्रमूठ

ढाणकी (प्रतिनिधी):
“शहराचा विकास करणे आणि जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे सर्व प्रकारचे राजकारण विसरून गावाच्या हितासाठी आणि विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन,” असे खंबीर प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना सुंदरकांता वासमवार यांनी केले. ढाणकी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट) होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील चंद्रे, शिवसेना ठाकरे गट संदीप ठाकरे,दत्तराव शिंदे, यांची उपस्थिती होती.
विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही: खा. आष्टीकर
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्वाही दिली की, “ढाणकी शहराच्या प्रगतीसाठी खासदार निधीतून भरीव मदत केली जाईल.” तर बाळासाहेब पाटील चंद्रे (काँग्रेस) यांनी “आता गट-तट बाजूला सारून सर्वांनी केवळ ढाणकीत विकासाची गंगा आणण्यासाठी एकत्र यावे,” असे आवाहन केले.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शहरात नवीन ‘नगर विकास आघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. यात एमआयएम (३), शिंदे शिवसेना (३), काँग्रेस (२) आणि नगराध्यक्ष ठाकरे गट (१) अशा एकूण ९ जणांच्या संख्याबळासह ही आघाडी सत्तेत आली आहे. या आघाडीच्या उभारणीत आणि सर्व पक्षांना एकत्र आणण्यात काँग्रेस नेते बाळासाहेब पाटील चंद्रे यांनी स्थानिक पातळीवर अत्यंत निर्णायक भूमिका बजावली.

या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, माजी नगर उपाध्यक्ष झहीर भाई, खाजाभाई कुरेशी, सूर्यकांत वासमवार, लाला भाई (एमआयएम), संजय सल्लेवाड (शिंदे गट), दत्तदिगंबर वानखेडे (नगरसेवक), प्रफुल चौरे (नगरसेवक), नगरसेवक ढोबळे, सादिक भाई (मनसे अध्यक्ष), शेख एजाज, स्वप्निल चिकाटे, आनंद पोपुलवाड ,खालिद भाई, जब्बार भाई, शिवाजी फाळके, ओम पाटील चंद्रे यांच्यासह नगर विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. नगरपंचायतीचे मुख्याधिकार अजय कुरवाडे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे स्वागत करून त्यांना अधिकृत पदभार सोपवला.

Google Ad
Google Ad

1 thought on “राजकारण विसरून ढाणकीचा चा पाणीची समस्या सोडवणार व विकास करणार : नगराध्यक्षा सौ.अर्चना सुंदरकांता वासमवार नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न; भाजपला रोखण्यासाठी ‘नगर विकास आघाडी’ची वज्रमूठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!