अकरा महिन्या पासुन समस्या सुटेना स्थानिक ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू ढाणकी

अकरा महिन्या पासुन समस्या सुटेना बेमुदत आमरण उपोषण सुरू
ढाणकी
येथील प्रभाग क्रमांक ९ मधील तोटेवाड कॉलनी येथे, अवैध अतिक्रमणाविरोधात स्थानिक नागरिक, आज दिनांक ८ ऑक्टोंबर २०२५ पासून बेमुदत आमरण उपोषणास त्याच ठिकाणी बसले. नगरपंचायत प्रशासनाने सदर अवैध अतिक्रमण मुक्त करून स्थानिकांना न्याय द्यावा. संबंधित अतिक्रमणधारकास नगरपंचायत प्रशासनाने नोटीस देऊनही, अतिक्रमण धारक जुमानत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रत्येकाने असे केल्यास सामान्य नागरिकास न्याय कसा मिळेल ? यापुढे नगरपंचायत प्रशासन हतबल का असावे ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत.
आज उपोषणाचा पहिला दिवस परंतु वृत्त लिहीपर्यंत, तब्येतीची तपासणी करण्याकरिता प्रशासनाने कोणता डॉक्टरही पाठवून दिला नाही. अस उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे.
सदर विषय नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा व स्थानिकांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी उपस्थित नागरिक करताना दिसले.