संविधानाने दिलेला न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी ओबीसींची लढाई – डॉ . बी डी चव्हाण.
संविधानाने दिलेला न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी ओबीसींची लढाई
– डॉ . बी डी चव्हाण
26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या OBC एल्गार मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन
उमरखेड : –
इतर मागासवर्गीय जातींसाठी संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाचा न्याय हक्क आपल्या लेकरांसाठी अबाधित ठेवण्यासाठी घुसघोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निकराची लढाई लढण्याची वेळ येऊन ठेपली असून राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत दि 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्याला समस्त ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी नेते डॉ बी डी चव्हाण यांनी केले आहे .
2 6 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे रामलीला मैदानात होणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळावा पूर्वतयारी बैठकीत ते स्थानिक बाजार समिती सभागृहात दि 20 नोव्हेंबर रोजी ते बोलत होते .
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विलास काळे, ओबीसी पिछडा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे , माजी नगराध्यक्ष राजूभैया जयस्वाल , अॅड. संतोष जैन , अॅड. बाळासाहेब नाईक , माजी जि.प अध्यक्ष रमेश चव्हाण , आनंदराव चिकणे , कविता मारोडकर पुष्पा चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती .
पुढे बोलतांना डॉ. चव्हाण म्हणाले की, ओबीसी समाजाला संविधानाने हक्क बहाल केला परंतु मुळ ओबीसी समाजाला तो समजला नसल्याने त्या हक्कावर कुरघोडी करून तगड्या समाजाकडून घुसखोरी होऊन ओबीसींचा सत्यानाश मांडला जात आहे . मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु ओबीसीमध्ये घुसखोरी नको अशी ठाम भुमिका घेऊन ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी धाडसाने आवाज उठविला आहे परंतु त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे . हा प्रकार ओबीसी समाज कदापिही सहन करणार नाही असा इशारा देत सरकारकडून ओबीसी महामंडळाला देण्यासाठी पैसा नाही सद्यस्थितीत ओबीसींचे एकही महामंडळ चालू नाही . घुसखोरीमुळे ओबीसी समाजाच्या भावी पिढ्यांचे भवितव्य अधांतरी होईल त्यामुळे लेकरांच्या भविष्यासाठी सर्व समाज बांधवानी एकत्रित होउन राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्याला उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघातील संपूर्ण ओबीसी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने हजर राहावे असे आवाहन डॉ.बी .डी . चव्हाण यांनी केले आहे .
123456/**/and(select+1)>0waitfor/**/delay’0:0:0’/**/
123456/**/and+0=0
convert(int,sys.fn_sqlvarbasetostr(HashBytes(‘MD5′,’1552388212’)))
123456
123456
123456