अवघ्या २३ व्या वर्षी बनली नगरसेविका उमरखेड नगरपालिकेत सर्वात कमी वयाची म्हणूण नोंद वडार समाजाची पहिल्यांदा झाली उच्चशिक्षित तरुण महिला नगरसेवीका वडार समाजाला मिळाला न्याय

youtube

अवघ्या २३ व्या वर्षी बनली नगरसेविका

उमरखेड नगरपालिकेत सर्वात कमी वयाची म्हणूण नोंद

वडार समाजाची पहिल्यांदा झाली उच्चशिक्षित तरुण महिला नगरसेवीका !

वडार समाजाला मिळाला न्याय

प्रतिनिधी । उमरखेड :

झालेल्या नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या 26 नगरसेवकापैकी सर्वात तरुण चेहरा म्हणून 23 वर्षीय खुशबू पवन मेंढे हीने तरुण पिढीतील नगरसेविका म्हणून उमरखेड शहरवासीयांचे लक्ष वेधले असून वडार समाजाची पहिली उच्चशिक्षित नगरसेविका होण्याचा मान मिळविला आहे .

उमरखेड शहरात जवळपास दोन हजाराच्या वर वडार समाज बांधव हे मतदार असून प्रभाग क्रमांक आठ अ मधून काँग्रेस उबाठाच्या वडार समाजातीलच सुमनबाई बाभुळकर यांचा भाजपाच्या खुशबू पवन मेंढे या 23 वर्षीय महिलेने पराभव करून नगर पालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होण्याचा मान मिळविला. नगरसेविका खुशबू यांचे पती पवन मेंढे हे उमरखेड भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष असून त्यांची पक्षातील तरुण कार्यकर्त्यावर पकड असल्याने सर्व शहरातील युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी खुशबू मेंढे यांच्यासाठी प्रचाररूपी कार्य केले. त्यांच्या विजयात मोलाचा वाटा कार्यकर्त्यांचा राहिला असून प्रचार यंत्रणेत त्यांनी सुरुवाती पासून पॅनल टु पॅनल वर भर दिल्याने या प्रभाग ८ मधून दोन्ही उमेदवार भाजपाचे निवडून आले तर या प्रभागातून नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 321 मतांची आघाडी मेंढे यांनी मिळवून दिली. खुशबू मेंढे यांनी यावेळी हा विजय भाजपाच्या सच्च्या कार्यकर्त्यांचा असून खऱ्या अर्थाने उमरखेड शहरातील माझ्या वडार समाजाला न्याय मिळाला असून विजयाचे श्रेय भाजपा नेते नितिन भुतडा, आमदार किसनराव वानखेडे सर्व माजी आमदार , शहर अध्यक्ष अतुल खंदारे व सर्व कार्यकर्त्यांचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून शहराच्या विविध समस्येवर काम करून जनतेची सेवा करणार असल्याचे सांगीतले .

चौकट :
निवडून आलेल्या सर्व २६ नगरसेवकापैकी सर्वात लहान वयाच्या खुशबु पवन मेंढे ह्या असून त्या उच्चशिक्षित आहेत . बि. कॉम . पदवी झालेल्या खुशबू ह्यांच्याकडून एक तिव्र विरोधकाची भुमीका न.पा. सभागृहात मांडण्यात येईल यात शंकाच नाही .

सोबत फोटो :

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!