विरोधकाचे धाबे दणाणले, सहकार पॅनलची विजयाकडे आगेकूच. 

youtube

 

विरोधकाचे धाबे दणाणले, सहकार पॅनलची विजयाकडे आगेकूच

यवतमाळ …
यवतमाळ जिल्हा शालेय सहकारी पतसंस्था रजिस्टर नंबर 147 च्या संचालक मंडळाची निवडणूक रविवार दिनांक 10 जुलै 2022 रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत सत्तारूढ सहकार पॅनल व विरोधकांचे परिवर्तन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातून 15 संचालक निवडले जाणार आहेत. मागील 20 वर्षापासून या पतसंस्थेत सत्तारूढ असलेल्या संचालक मंडळाने पतसंस्थेच्या आजीव सभासदांना उत्तम सेवा प्रदान करीत पतसंस्थेच्या विकासाचा ध्यास घेतला होता. सभासदांचे हित सर्वोच्च स्थानी ठेवून पतसंस्थेच्या विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे covid-19 च्या काळात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या रुग्णापर्यंत पोहोचून कार्यकारी मंडळाने सेवा दिल्यामुळे सभासदांमध्ये सहकार पॅनल बद्दल आपुलकीभाव निर्माण झाला आहे. सहकार पॅनलने या निवडणुकीच्या निमित्ताने पॅनलचा वचनपूर्तीनामा,पतसंस्थेचा प्रगती दर्शक अहवाल, जाहीरनामा व जिल्ह्यातील 21 नामांकित संघटनांना सोबत घेऊन पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची फळी उतरविली आहे. विरोधकांनी आपल्या प्रचाराची पातळी सोडल्यामुळे त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलला मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकंदरीत सहकार पॅनल चा सोळा तालुक्यातील नियोजन बद्ध प्रचार व दांडगा संपर्क पाहता येत्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार व उमरखेड सर्वसाधारण मतदार संघातुन श्री. प्रमोद देशमुख उपक्रमशील मुख्याधापक असुन शिक्षण क्षेत्रात त्याची कामगीरी उत्कृष्ट असल्यामुळे त्यांच्या सोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंदाचा पाठिबा भक्कम असून ते व सर्व सहकार पॅनलचे उमेदवार विजय होतीलच अशा प्रकारचे वातावरण संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. या सहकार पॅनलसोबत तालुक्यातच नव्हे तर यवतमाळ जिल्हात सर्व संघटनाच्या माध्यमातून पांठीबा मीळत असुन सहकार पॅनलची विजयाकडे घोडदौड चालु असुन विजयश्री निशितच आहे . सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून विजय निश्चित असल्यासंबंधी चर्चा चर्चील्या जात आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “विरोधकाचे धाबे दणाणले, सहकार पॅनलची विजयाकडे आगेकूच. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!