भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान व कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने चातारी येथे लंपी रोग मोफत लसीकरणाचे आयोजन.

youtube

भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान व कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने चातारी येथे लंपी रोग मोफत लसीकरणाचे आयोजन.

उमरखेड दि 24 ( प्रती ): मौजे चातारी व उंचवडद येथे जनावरावरील महाभयंकर विषाणूजन्य लंपी त्वचा आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारीच्या प्रांगणात करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्तकार श्री दादाराव माने पाटील तर उद्घाटक म्हणून डॉ. विजयराव माने साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हरितक्रांतिचे जनक स्व. वसंतराव नाईक, संस्थापक अध्यक्ष स्व देवराव पाटील चोंढीकर, सत्यशोधक भाऊसाहेब माने आणि शिक्षणमहर्षि स्व पंजाबराव माने यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.
या कार्यक्रमामध्ये जनावरांची मनोभावे सेवा करणार्‍या डॉ.गायकवाड, डॉ.तावडे, डॉ. गजानन अंबाळकर, डॉ.इंगोले, श्री बाबुराव कदम, प्रफुल्ल पडघणे, नीलेश भूपतरे, अंकुश कदम यांचे गावातील शेतकर्‍यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन करतांना सद्यस्थितीमध्ये लंपी या आजाराने संपूर्ण जगाला भंडाउन सोडल्यामुळे पशूवैद्यकाचे जनावरांना सेवा देतांना संख्याबळ कमी पडत आहे ही भावना लक्षात घेऊन अडचणीत सहकार्य केले पाहिजे हा उद्देश होता. अशावेळी काळाची गरज ओळखून शेतकर्‍यांच्या अडचणीच्या काळात ज्या पद्धतीने स्व भाऊसाहेब माने हे सर्वसामान्य शेतकर्‍यांकरिता निस्वार्थपणे झटत असत अगदी त्याच पद्धतीने त्यांचे नातू डॉ. विजयराव माने झटतांना दिसतात. पशूवैदकांचे अपुरे संख्याबळ आणि त्यामुळे लसीकरणाला लागणारा वेळ यामुळे त्यांनी आपल्या कृषी महाविद्यालय उमरखेड येथील १२० विद्यार्थ्याना यासंदर्भातील योग्य असे प्रशिक्षण देऊन लसीकरणासाठी तयार केले तसेच लसीचा तुटवडा असतांना खाजगी कंपनीकडे स्वखर्चातून मागणी करून एक हजार लस उपलब्ध केल्या आणि आपल्या गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्‍यांची हेळसांड होऊ नये याकरिता स्वता पुढाकार घेत आपल्याच गावात लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये चातारी व उंचवडद परिसरातील बहुसंख्य जनावरांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरण मोहिमेमध्ये सर्व पशूवैदकांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमप्रसंगी बाबुराव माने, भीमराव माने, दत्तराव माने, शामराव माने, उत्तम गोविंदवार, कोंडबाराव माने, कल्यानराव माने, शिवाजीराव माने, डॉ. गोविंदवार, सरपंच सौ.रंजनाताई माने, सदाशिव माने, प्रदीप वाठोरे, भीमराव वाठोरे, भारत माने, चंदू पवार, गजानन माने, शिवाजी माने, अशोक माने, आनंदराव माने, माधव माने, संजय पसलवाड, कैलासराव माने, शिवाजी नरवाडे, भागाजी शिवरतवाड, बापूराव माने,बालाजी भवर यासह गावातील असंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन चिंतलेव त्यांची टीम, मुख्याध्यापक पेंटेवाड सर व सर्व कर्मचारी वर्ग, प्राचार्य प्रकाश पेंटेवाड सर, पांडुरंग माने सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा.संतोष माने यांनी केले.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान व कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने चातारी येथे लंपी रोग मोफत लसीकरणाचे आयोजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!