शेतकऱ्यांनो विरोधी सरकारला उलथुन टाका – उद्धव ठाकरे

youtube

शेतकऱ्यांनो विरोधी सरकारला उलथुन टाका – उद्धव ठाकरे

उमरखेड:{ शहर प्रतिनिधी }

शेतमालाचे पडलेले भाव शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दाखविलेले आमिष न मिळालेला पिक विमा अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी देण्यात आलेली आर्थिक मदत या सर्व गोष्टीवरून राज्यातील शिंदे फडणवीस सरकार किती शेतकरी विरोधी आहे हे आता स्पष्ट झाले असून होणाऱ्या निवडणुकीत या सरकारला उलथून टाका असे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उमरखेड येथील जनसंवाद मेळाव्यात बोलताना म्हणाले . याप्रसंगी खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संजय देशमुख माजी आमदार अनिल देसाई जयप्रकाश मुंदडा माजी खासदार सुभाष वानखेडे जयप्रकाश दांडेगावकर शिवसेना संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे मोहनराव मोरे शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड घटक पक्षाचे सर्व प्रमुख या जनसंवाद मेळाव्याला यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या मेळाव्याला मार्गदर्शन करीत राज्य व केंद्र शासनावर टीकास्त्र डागले. तर यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात सरकार लादले असल्याचा घनाघात करीत यांनी येथील बेरोजगारांना रोजगार देऊ म्हणत बेरोजगारांना उलट अमित शहा व 40 गद्दारांवर उद्योग तोफ डागली या जनसंवाद मेळाव्याला उमरखेड विधानसभा मतदारसंघ किनवट विधानसभा मतदारसंघ हदगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेना व महाआघाडीच्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती

{चौकट }

हिंगोलीतील हळद प्रक्रिया उद्योग ही माझीच देण! हिंगोली होत असलेला हळद प्रक्रिया उद्योग हा मी मुख्यमंत्री असतानाच मंजूर केला असून याचे श्रेय गद्दार खासदार हे घेत असून असे श्रेय घेतल्याने कुणी मोठा होत नसतो असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली चे खासदार यांच्यावर डागत सहकारी तत्त्वावर असलेला शेजारील कारखाना सहकार चळवळ मोडीत काढणारा . मतदार संघाचा काय विकास करू शकेल असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित करीत शिंदे गटात सामील झालेल्या खासदार हे हेमंत पाटील यांचा खरपूस समाचार यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!