जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा पुसद येथे संपन्न.

youtube

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा पुसद येथे संपन्न

*पुसद* –

अनंत श्री विभूषित जगद्गुरुश्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन सोहळा पुसद येथे दि -5 फेब्रुवारी 2023 रोज रविवार सकाळी 9 : 00 संपन्न झाला.हा सोहळा पुसद शहरातील यूपी चार्ट च्या बाजूला ,जिजामाता मंगल कार्यालयाजवळ, कारला रोड पुसद शहर जिल्हा यवतमाळ पश्चिम येथे घेण्यात आला. अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ शेगावचे पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे पीठ सहप्रमुख देवेंद्र दलाल ,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे , जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, पीठ संजीवनी योजना प्रमुख अमोल भाऊ कोथळकर, जिल्हाध्यक्ष अशोक महल्ले यांनी दिली. भव्य शोभायात्रेने सुरुवात झाली. सर्वप्रथम मोटे मामा यजमानपद यांच्या घरून सिद्ध पादुकांचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. रथामध्ये जगद्गुरुश्रींची प्रतिमा व जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका यासह ही मिरवणूक दत्त मंदिर या ठिकाणाहून सुरुवात होऊन यूपी चार्ट रोड मार्गे, कारला रोड जिजामाता मंगल कार्यालय जवळील सभा मंडप या ठिकाणी पोहोचली. भव्य अशा शोभायात्रेमध्ये अनेक प्रकारचे देखावे तयार करण्यात आली होती. त्यामध्ये बंजारा नृत्य, भजनी मंडळ, विना, बॅंड पथक, कलशधारी महिला, निशानदारी पुरुष यांचा समावेश होता.
या शोभायात्रेचे शुभागमन वाजत गाजत सकाळी अकरा वाजता संत पिठावर झाले. सर्वप्रथम जगद्गुरुश्रींची सामुदायिक आरती संपन्न झाली. याप्रसंगी अनिताताई मनोहरराव नाईक , माजी आमदार विजय भाऊ खडसे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तातुभाऊ देशमुख , पुसद अर्बन बँकेचे संस्थापक शरद भाऊ मैंद, रविभैय्या ग्यानचंदानी, नायब तहसीलदार गजानन कदम, सचिन विताडे बांधकाम कंत्राटदार, नारीशक्ती न्यूज चॅनलचे सविता चंद्रे, सचिन गाडगे, अजय भाऊ क्षीरसागर, राधेश्याम जांगिड, रविभाऊ पदमवार यांची उपस्थिती लाभली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत दुर्बल घटकातील गरजवंतांना 10 शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक गुरुपूजन करण्यात आले. याप्रसंगी जगद्गुरुश्रींचे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले. हजारो भाविकांनी सिद्ध पादुकांचे यावेळी दर्शन घेतले. ज.न.म .प्रवचनकार बोरसे अण्णा यांचे अतिशय सुंदर असे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले. त्यांनी आपल्या प्रवचनातून जीवनात गुरु का करावा आपल्या जीवनामध्ये गुरुचे महत्व किती अनन्यसाधारण आहे हे सविस्तरपणे उपस्थित भक्तगणांना समजावून सांगितले. यावेळी जिल्ह्यातील 161 भक्तगण यांनी उपासक दीक्षा घेतली. तसेच 450 भाविकांनी गुरुपूजनाचा लाभ घेतला.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान तर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये मरणोत्तर देहदान, रक्तदान शिबिर , आदिवासी पाड्यातील गरीब मुलांसाठी मोफत ड्रायव्हिंग स्कूल, गोरगरिबांच्या मुलासाठी नाणीज येथे इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, मोफत रुग्णालय,राज्यातील पाच हायवे वरती 24 तास विनामूल्य अंबुलन्स सेवा अविरतपणे चालू असते, महापुर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वरूप संप्रदाय समाजाच्या हितासाठी व मदतीसाठी सतत अग्रेसर असतो. अनेक समाज उपयोगी उपक्रम स्व स्वरूप संप्रदायातर्फे राबविले जातात.
याप्रसंगी उपस्थित भक्तगणांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी हिंदू संग्राम सेनेचे पश्चिम विदर्भ पिठाचे लेफ्टनंट जनरल नागेश भाऊ पांचाळ व त्यांच्या सर्व टीमने हा कार्यक्रम यशस्वीरित्या आणि शिस्तबद्ध रित्या होण्यासाठी अतिशय सुंदर परिश्रम घेतले. तसेच पीठ सेवा विभागाचे प्रमुख अशोक गोंदाने साहेब,यवतमाळ पूर्व निरीक्षक गोविंद उपासे , जिल्हा महिलाध्यक्षा सौ.शैला कवाने ,सचिव संजय राठोड , जिल्हा कर्नल बाळू खंधारकर,युवा प्रमुख प्रवीण कदम, प्रसिद्धी प्रमुख अशोक पौरवार,तालुकाध्यक्ष सविता अंतागडे , राजेश म्यात्रे , दुर्गाताई गव्हाणकर, गजानन देशमुख , गजू वनारे,भारत वानखडे ,नंदू काळे ,अंकिता भोयर ,सीमा भोयर यांच्यासह जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी ,तालुका सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, संतसंग सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी, अखिल भारतीय हिंदू संग्राम सैनिक ,युवा सेना ,महिला सेना ,आरती सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी गुरुमाऊली यांची सांज आरती घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Google Ad
Google Ad

1 thought on “जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा पुसद येथे संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!