बांबू लागवडीमुळे शेतात ऊर्जा स्रोत तयार होणार -पाशा पटेल भव्य भूमिपूजन सोहळा व कृषी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

youtube

बांबू लागवडीमुळे शेतात ऊर्जा स्रोत तयार होणार -पाशा पटेल

भव्य भूमिपूजन सोहळा व कृषी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

उमरखेड – शहर प्रतिनिधी

उमरखेड तालुक्यात पंचायत समिती व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने भव्य भूमिपूजन सोहळा व कृषी मार्गदर्शन शिबीर दिनांक २५ ऑक्टोबर शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेड मध्ये पार पडले. या प्रसंगी राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष ना. पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना हवामान बदल, पावसाचे अनिश्चित प्रमाण, जमिनीतील कार्बन घट आणि आगामी २०५० पर्यंतच्या कृषि आव्हानांवर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किसन वानखेडे, कृषी मार्गदर्शक पांडुरंग आव्हाड, माजी आमदार प्रकाश देवसरकर, विजय खडसे, नामदेव ससाणे, रमेश चव्हाण, डॉ विजय माने, डॉ अंकुश देवसरकर, सभापती कृष्णा पाटील देवसरकर, मानद सचिव चिंतागराव कदम, भिमराव चंद्रवंशी, नितीन माहेश्वरी, शिवाजी माने, सुदर्शन रावते, कृषी अधिकारी अभय वडकुते, स्थानिक मान्यवर व लोकप्रतिनिधी व अन्य संचालक उपस्थित होते. प्रास्ताविक नितीन भूतडा यांनी केले.

हवामान बदलाची तीव्रता – शेतकऱ्यांनी पिकपद्धतीत बदल करणे काळाची गरज
पाशा पटेल म्हणाले की,
“पूर्वी महिनाभर वितळत पडणारा पाऊस आता १० दिवसांत संपतो. हवेतील कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमान वाढते, त्यामुळे पिकांची उत्पादकता आणि जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे. ऊस, पेट्रोल, कोळसा यांसारख्या संसाधनांचा अतिवापर ग्रामीण पर्यावरणावर परिणाम करीत आहे.”

शाश्वत शेतीकडे वाटचाल
त्यांनी पुढे सांगितले की –
शेतीत कार्बन शोषक झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर व्हावी
ऊर्जेचा वापर कमी करून सौर व इतर पर्यायी ऊर्जास्रोतांचा प्रसार व्हावा
पाणी साठवण आणि शाश्वत सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक

सहकारातून ग्रामीण विकास
यावेळी व्यापारी संकुल, दुकान गाळे संस्था तसेच सहकार क्षेत्रातून निर्माण झालेल्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात रोजगार आणि बाजारपेठ निर्मितीची संधी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. “शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नवाढ साधणे हे सरकारचे प्राधान्य असून छोटे उत्पादक मागे राहणार नाहीत,” असे पाशा पटेल म्हणाले.

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तालुकाभरातील शेकडो शेतकरी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. हवामानाचे बदलते चक्र व त्यातून शाश्वत शेतीचे महत्त्व या विषयावर महिती विषद केली

Google Ad
Google Ad

2 thoughts on “बांबू लागवडीमुळे शेतात ऊर्जा स्रोत तयार होणार -पाशा पटेल भव्य भूमिपूजन सोहळा व कृषी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!