उमरखेड तालुक्यातील पुर्नवसीत दोन गावांना वाढीव पॅकेज द्या – आमदार ससाने जवराळा व परोटी गावासाठी सरसावले.

उमरखेड तालुक्यातील पुर्नवसीत दोन गावांना वाढीव पॅकेज द्या – आमदार ससाने जवराळा व परोटी गावासाठी सरसावले.

youtube

उमरखेड तालुक्यातील पुर्नवसीत दोन गावांना वाढीव पॅकेज द्या – आमदार ससाने जवराळा व परोटी गावासाठी सरसावले

प्रतिनिधी
उमरखेड :

तालुक्यातील मौजे परोटी (वन) व जवराळा या दोन गावाचे स्वइच्छेने पुर्नवसन होणे व वाढीव पॅकेज संदर्भात आमदार नामदेव ससाने यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याने लवकरच या दोन्ही गावाचे पुनर्वसन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे .
उमरखेड मतदार संघातील मौजे परोटी (वन) व मौजे जवराळा या दोन्ही गावाची पुर्नवसन प्रक्रिया सुरु आहे. त्यांनी सुरुवातीपासुनच मौजे रानबोडी हल्ली ता. उमरेड जि. नागपूर यांच्या प्रमाणे पुर्नवसन करण्याची मागणी केली आहे. तिथे दिल्या गेलेल्या सर्व सवलती त्यांना सुध्दा लागू कराव्यात. गावठाणसाठी लागणारी जागा प्रती कुटुंब 1500 चौ. फुट मोफत भुखंड देण्यात यावा, या दोन्ही गावचा रेडी रेकनर दर अत्यंत कमी असल्यामुळे त्यांच्या जमीनीचे मुल्यांकन अतिशय कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत शेत जमीनीचा योग्य मोबदला देण्यात यावा आणि पुर्नवसीत ठिकाणी सर्व कुटुंबांना सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या तसेच केंद्र शासनाचा शासन निर्णय पर्यावरण वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय दि. 8/4/2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार वाढती महागाई याचा विचार करुन प्रति कुटुंब मिळणारे पॅकेज रक्कम रुपये 10,00,000/- (अक्षरी दहा लक्ष रुपये) वरुन वाढवुन रुपये 15,00,000/- (अक्षरी पंधरा लक्ष रुपये) देण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार ससाने यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटीतून केली असून याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्याकडे पाठविले आहे यावेळी
प्रदीप नामदेव घुले (जवराळा )
संजय गोपी जाधव , रमेश संभाजी तीळेवाड , भारत खेलभाडे ( ए सी एफ उमरखेड ) हे उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group