पिंपळगाव टाकळी बंधाऱ्याचे गेट तुटल्याने प्रचंड पाणी गळती (सावळेश्वर) –
पिंपळगाव टाकळी बंधाऱ्याचे गेट तुटल्याने प्रचंड पाणी गळती
(सावळेश्वर) –
उमरखेड व हिमायतनगर तालुक्यातील जीवनवाहिनी असलेल्या पैनगंगा नदीवरील पिंपळगाव टाकळी येथील बंधाऱ्यातील गेट ची बांधणी तुटल्यामुळे लाखो लिटर पाणी मिनिटाला गळती होत आहे. त्यामुळे हजारो हेक्टर वरील सिंचनासाठी दोन ते तीन महिने दरवर्षी उपलब्ध होणारे पाणी काही दिवसात संपून जाईल अशी चिंता परिसरातील शेतकऱ्यांची लागली हा बंधारा विदर्भातील उमरखेड व मराठवाड्यातील हिमायतनगर तालुक्यात वीस ते पंचवीस गावातील पाण्याचा स्त्रोत आहे. गावातील पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांसाठी तसेच शेती साठी अतिशय आवश्यक आणि गरजेचा पाणी साठा याद्वारे होत असतो. यावर्षी बंधाऱ्याच्या भरवश्यावर हजारो हेक्टर वर ऊस तसेच इतर रब्बी पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. अश्या महत्त्वाच्या पाण्याच्या साठ्याची गळती अशीच चालू राहिली तर येणाऱ्या काळात या भागात खूप मोठी पाणी टंचाई जाणवेल. तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होईल हे नक्की.
बंधाऱ्याच्या सिंचन क्षेत्रातील मराठवाडा विभागातील वारंग टाकली, धानोरा, बोरागडी, कोठा, कोठा तांडा, शेळोडा, सिरपल्लि, एकंबा तसेच विदर्भ विभागातील बिटरगाव, पिंपळगाव, सावलेश्वर, गांजेगाव, भोजनगर, शिंडगी व इतर गावे आहेत. बंधाऱ्यातील पाणी गळतीमुळे या परिसरातील शेतकऱ्याचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यांनी या दुरुस्तीसाठी लगेच हालचाल करून पाणी गळती थांबवावी ही परिसरातील शेतकऱ्यांची व सामान्य जनतेची विनंती आहे. दोन्ही तालुक्यात राजकीय पुढाऱ्यांमार्फत मदतीची अपेक्षा भागातील शेतकरी मागत आहेत.
चौकट
उमरखेड-हिमायतनगर तालुक्यातील या वर्षीचा रब्बी व ऊस हंगाम गेला तर
हजारो शेतकऱ्यांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होणारी घटना तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता. लाखो लिटर पाण्याची मिनिटाला गळती होत आहे….पिंपळगाव टाकळी बंधाऱ्याला (उमरखेड तालुक्यातील भोजनगर, बिटरगाव, सावळेश्र्वर, गांजेगाव, शिंदगी ची सिंचन क्षेत्र) (हिमायतनगर तालुक्यातील वारंग टाकळी, धानोरा, बोरगडी, कोठा, कोठा तांडा, शेलोडा, सिरपल्ली, एकांबा चे सिंचन क्षेत्र ) खूप मोठे भगदाड पडले आहे. एक गेट पूर्ण तुडून गेला आहे. पुढील पंधरा दिवसात संपूर्ण पाणी संपून जाण्याची शक्यता.
यावर उपाय आहे पण कुठलीही यंत्रणा काम करत नाहीय. या भागातील प्रशासन व शेतकऱ्यांना अजून प्रश्नाचे गांभीर्य कळलेले नाहीय. येणारा उन्हाळा तीव्र पाणी टंचाई नक्की भासणार हे नक्की आहे. संबंधित अधिकारी, परिसरातील राजकीय पुढारी आणि तांत्रिक यंत्रणानी दुरुस्ती पाठपुरावा तत्काळ होणे आवश्यक आहे.
रमेशराव राव रावते,सामान्य शेतकरी.