उमरखेड येथील मराठा क्रांती ठोक मोर्चा चे नियोजन बैठक संपन्न.
उमरखेड येथील मराठा क्रांती ठोक मोर्चा चे नियोजन बैठक संपन्न
[ खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका अंतिम ]
प्रतिनिधी उमरखेड :- उमरखेड येथे मराठा क्रांती ठोक मोर्चा ची बैठक दिनांक 3 जून रोजी येथील विश्रामगृह उमरखेड येथे पार पडली या बैठकीत सकल मराठा समाज यांनी मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या चौकटीत मिळावे यासाठी आंदोलनाची रूपरेषा ठरविण्या करिता आज बैठक बोलावली होती या बैठकीत आंदोलन कसे असावे या विषयावर अनेकांनी आपले मत व्यक्त केले सदरील बैठकीत मराठा समाजाला आव्हान करण्यात आले मराठा समाजाने आपसातले मतभेद विसरुन युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या सोबत तन-मन-धनाने राहून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सोबत राहायला हवे, तसेच महाराजांनी 6 जूनला घेतलेली भूमिका ही मराठा क्रांती ठोक मोर्चा उमरखेड तालुका यांच्यासाठी महत्त्वाची असेल असे सर्वानुमते ठरविण्यात आले, तसेच महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका लेखी स्वरुपात स्पष्ट करावी अन्यथा त्यांना त्यांच्या मतदारसंघात फिरकू सुद्धा देणार नसल्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली, तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये मराठा आरक्षण संदर्भात ठराव घ्यावा व मराठा क्रांती ठोक मोर्चा चे प्रकाश जाधव यांच्याकडे सुपूर्त करावा अशी विनंती तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना करण्यात आली, तसेच उमरखेड येथे लवकरात लवकर संभाजी राजे छत्रपती यांची सभा घेऊ असे आश्वासन प्रकाश जाधव यांनी बैठकीत सर्व सकल मराठा समाज बांधवांना दिले. या बैठकीत उपस्थित प्रवीण सूर्यवंशी सर सचिन घाडगे प्रकाश जाधव नितीन शिंदे संजय माने गजानन चव्हाण गुणवंत सूर्यवंशी अमोल पतंगराव शंकर कदम वैभव वाघमारे त्तराव माने अवधूत देवसरकर एडवोकेट शिवाजीराव वानखेडे ज्ञानेश्वर लोखंडे वैभव वाघमारे बंडू भुते सरोज देशमुख युवराज देवसरकर वादी मराठा समाज बांधव उपस्थित होते.
चौकट :- *युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जी भूमिका घेतील ती भूमिका करो या मरो उक्तीप्रमाणे अमलात आणू सचिन घाडगे*
I was reading through some of your content on this internet
site and I think this internet site is rattling instructive!
Keep posting.Blog money