मुलीचा प्राण वाचवणार्‍या पोलिसांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाकडून सत्कार

youtube

*मुलीचा प्राण वाचवणाऱ्या पोलिसांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार*

तळा, रायगड : मुलीचा प्राण वाचवणारे तळा पोलीस ठाणेचे पोलीस अनंत प्रभाकर घरत यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
तळा तालुक्यातील रोवळा गावातील कुमारी ज्ञानेश्वरी रमेश शिगवण वय वर्षे १८ तिला सायंकाळी सर्पदंश झाल्याने त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र तळा या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर तळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर तात्काळ उपजिल्हा रुग्णालय माणगाव या ठिकाणी दाखल करणे गरजेचे होते परंतु तळा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अगोदरच दुसऱ्या रुग्णाला घेऊन गेली होती, त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने कर्तव्यदक्ष तळा पोलीस अंमलदार अनंत प्रभाकर घरत यांच्याशी संपर्क साधल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता घरत यांनी स्वतःच्या खाजगी वाहनातुन त्या मुलीला आणि तिच्या आईला घेऊन उपजिल्हा रुग्णालय माणगाव या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीने त्या मुलीचे प्राण वाचू शकले आणि आता त्या मुलीची तब्येत ठीक आहे.
अनंत प्रभाकर घरत तळा पोलीस अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक संपूर्ण तालुक्यातुन होत आहे, त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तळा पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुरज गेंगजे, संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, तळा तालुका अध्यक्ष सुरेंद्र शेलार, उपाध्यक्ष नितीन लोखंडे, पोलीस अमलदार अनिल महाडिक, पोलीस गोपनिय कॉन्स्टेबल विष्णू तिडके आदी पदाधिकारी व पोलीस बांधव उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!