लाखो रूपयांचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात.

youtube

गावकऱ्यांच्या सतर्कतेने लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात! गुन्हा दाखल करण्यासाठी लागले तब्बल १८ तास

 

उमरखेड-

(दि,२५)  रात्री १०  च्या दरम्यान उमरखेड पोलीसांनी परराज्यातुन  हिमायतनगर( जि,नांदेड) येथे नेण्यात येणारा  लाखो रूपयांचा गुटखा    विडुळ येथील गावकर्‍यांच्या सतर्कतेने उमरखेड पोलीसांनी पकडला.  परंतु पकडलेल्या गुटख्याचे बाजारमुल्य कीती. या बाबत काथ्याकुट करण्यात व गुन्हा दाखल करण्यात पोलासांनी तब्बल १८ तास घालविल्याने, झालेल्या व होणार्‍या कार्यवाही बाबत साशंकता निर्माण झाली आहे.                        आयचर ट्रक (क्र HR 73 A 7844) हा  अंदाजे ५०  लाखांचा गुटखा घेऊन येत होता, आयचर मालक व चालक  निसार हुर्नर मौला  हा भरधाव वेगाने जात असताना पोलिसांना संशय आला असता आयशर ट्रक चा पाठलाग करत विडूळ येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने आयचर ट्रक पकढण्यात आले व विचारपूस केली असता त्यात खाद्य पदार्थ असल्याचे चालकाकडून सांगण्यात आले परंतु पोलिसांनी पाहणी केली असता, ट्रक मध्ये शंभर ते दीडशे गुटख्याचे पोती असल्याचे निदर्शनास आले. यावरुन उमरखेड उपविभागीय अधिकारी   प्रदिप पाडवी व    उमरखेड पोलीस  यांनी   सदर ट्रक ताब्यात पोलीस ठाण्यात आणला,

प्राप्त माहीती नुसार सदर गुटखा हा हिमायतनगर येथील तथाकथीत अंतरराज्यीय गुटखा तस्कराचा असुन, तो नेहमीच, मध्यप्रदेश तसेच आध्रांतुन यवतमाळ, उमरखेडच्या आडमार्गाने ही गुटखा तस्करी करीत असतो. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे  कार्यालयातील एक कर्मचारी त्यांचा मार्ग सुरळीत करण्यात महत्वाची भुमिका बजवत असतो अशी माहीती आहे.  शनिवारी रात्री दहा वाजता  प्राथमिक कार्यवाही झाली असतांना, रात्रभरात तपासाची सर्व चक्रे फिरवुन सकाळीच याबाबत गुन्हा दाखल करून पोलीसांनी अटकसत्र राबविणे अपेक्षित होते. परंतु रविवारी दुपारचे तीन वाजले तरी,  जप्त केलेल्या गुटख्याचे बाजारमूल्य किती याबाबत काथ्याकुट करण्यातच उमरखेड पोलिस गर्क होते. दुपारी तीन नंतर  गुन्हा दाखल करण्यात आला असून, उमरखेड पोलिसांनी ट्रक चालक, मालक या एकमेव इसमास अटक केली आहे. यावरून या गुटखा तस्करी चा मुख्य सूत्रधार मोकळा सोडण्यात व झालेल्या कारवाईत ढिलाई बाळगण्यात पोलिसांनी दाखविलेला हलगर्जीपणा संशयाच्या भोव-यात सापडला आहे.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “लाखो रूपयांचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!