उमरखेड ते लिबगव्हाण कँनाल पर्यत रोडची दयनीय अवस्था.

youtube

उमरखेड ते लिबगव्हाण कँनाल पर्यत रोडची दयनीय अवस्था

यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानंतर सुद्धा अद्याप कामास सुरुवात नाही

पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले

शेतकऱ्यांनी आता मात्र आरपारची लढाई लढण्याचा ईशारा

उमरखेड दि 29
. उमररखेड ते लिबंगव्हांण कॅनाल पर्यंत या अतिशय दयनिय अवस्थेत असलेल्या पांदण रस्त्याचे काम होण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी सन २००९ पासून माजी आमदार सर्वश्री मा. उत्तमरावजी इंगळे,विजयराव खडसे , राजेद्रंजी नजरधने तसेच विद्यमान खासदार मा. हेमंतजी पाटील, आमदार तथा नगराध्यक्ष मा.नामदेवरावजी ससाने तसेच मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांना असंख्य निवेदने देऊन व प्रत्यक्ष भेटी घेतल्या असता पांदण रस्त्याचे काम लवकरच चालु करू असे लेखी व तोंडी आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. त्यानंतरही प्रत्यक्ष काम चालु न झाल्याने ,दि. १७ ऑगस्ट २०२१ पासून शेकडो शेतकऱ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता.पंरतू यावेळेस मा.पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी पांदण रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष आक्टोंबर २०२१ पासून सुरूवात करू असे ठोस आश्वासन शिष्टमंडळाच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. परंतु मा.पालकमंत्री यांच्या आश्वासनानंतर सुद्धा प्रत्यक्ष काम न चालु झाल्यामुळे दि. २० नोव्हें. २०२१ रोजी झालेल्या शेतकरी -शेतमजूरांच्या चर्चेत उमरखेड – लिबंगव्हाण या अतिशय दयनिय अवस्था असलेल्या पांदण रस्त्याचे काम प्रत्यक्ष चालु होईपर्यंत पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता मात्र आमरण उपोषण हे पांदन रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देऊन या पुढील लढाई ही आरपारचीच असेल असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!