मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते पोफाळी साखर पुजन व शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन.

youtube

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते पोफाळी साखर पुजन व शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

उमरखेड
विदर्भ – मराठवाडा हा संपुर्ण सिमावर्ती परिसर संपुर्णपणे शेतकर्‍यांच्या काबाड कष्टातून उभा राहिला आहे . शेतकऱ्यांना हमी पिक म्हणून हा पर्याय होता . त्यातून सहकार क्षेत्रातील वसंत कारखाना अविरतपणे ४६ वर्ष साधु संताच्या संस्काराने शेतकऱ्यांच्या विकासाला आर्थिक गती प्राप्त झाली . शेतकऱ्यांना सिंचन गती अधिकाधिक वाढीव स्वरूपाची व्हावी म्हणून पैनगंगा नदी पात्रातील मंजुरी मिळालेल्या कोल्हापुरी बंधारे निर्मिती कामाची निविदा लवकरच काढून सिंचन अनुशेष पुर्णत्वास नेण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे प्राधान्याने राहणार आहेत . असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोफाळी येथे वसंत साखर कारखाना पुजन व शेतकरी मेळावा या कार्यक्रमात १० जानेवारी रोजी संबोधित करताना म्हणाले .
नागपूर हिवाळी अधिवेशनात बळीराज्याच्या भावना सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन विदर्भातील अनुशेष असलेल्या प्रश्नांवर राज्य सरकारची भावना वाढीव स्वरूपाची असतांना देखील काही प्रश्न मांडण्यापुर्वी विरोधकांनी गोंधळ घालून विकासाच्या प्रश्नांना चालण्या देण्यापेक्षा खिळ पाडण्याचा प्रयत्न केला राज्यातील सरकार सर्वाधिक पणे शेतकरी यांच्या बाजूने सदैव राहिले आहे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ ही येणारी वारंवार संकटे उभी ठाकली असतांना अनेक जाचक अटी बाजूला सारून दोन हजार शंभर मंडळातील पिक नुकसानीच्या तातडीने याद्या तयार करून संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यास प्रयत्नशिल आहेत . एक रुपया पिकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांची संख्या असून सुद्धा शेतकरी पिकविमा अग्रिम रक्कम देणारे राज्यातील सरकार प्रथम राहिले आहे बळीराजाच्या उतराईला शेतीपुरक व्यव्यसाय म्हणून धान – फळबाग, शेती उपयोगी अनुदानीत औजारे वाटप केल्या जात असल्याने शेतीपुरक व्यवसायासाठी ही जमेची बाजू ठरली आहे . यामध्ये अन्य वाटपासह ४४ कोटीची मदत आतापर्यंत दिली आहे . रस्ते , पुल , सिंचन बंधारे निर्मिती करण्यामध्ये राज्य व केंद्र सरकारचे ठरलेले संकल्पनात्मक धोरण असल्याने या विकासासाठी राज्याने केंद्र सरकारला आर्थिक मदत निधी वाढीव स्वरूपाचा मिळणे बाबत साकड़े घातल्याने राज्याचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी मोठी मदत ठरणार आहे .
राज्याचा मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा मुलगा झाल्याने मोठ्या धनिकांच्या पोटात पोटशुळ उठत आहे परंतू हे धनिक शेताच्या बांधावर कधी पोहचले नाही त्यामुळे अंशांना शेतकर्‍यांची दयनिय अवस्था काय समजेल असा टोला विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला . आजारी कारखान्यांना आर्थिक मदत देण्याची भावना सरकारची आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हताश होण्याची मुळीच गरज नाही असेही शिंदे म्हणाले . विदर्भ – मराठवाडा येथिल पैनगंगा नदीच्या पात्रात ७ कोल्हापुरी बंधारे निर्मितीसाठी मंजुरी प्रयत्न केल्याने नदीचे आध्रप्रदेशात वाहून जाणारे पाणी थांबल्या स्थित राहून या भागातील २५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याने वसंतच्या २६ हजार उस उत्पादक सभासदांना वाढीव उत्पन्नासाठी मोठी चालना मिळणार आहे तेव्हा एक हजार कामगारांच्या हाताला काम मिळेल . असे खासदार हेमंत पाटील म्हणाले .
कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड , खासदार भावना गवळी , आमदार नामदेव ससाणे , तानाजी मुटकुळे ,माजी खासदार शिवाजी माने , माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर ,विजयराव खडसे , राजेद्र नजरधने , भिमराव केराम , रामराव वडकुते , गजानन घुगे , तातु देशमुख , चितंगराव कदम , नितिन भुतडा, उमाकांत पापिनवार , नितिन माहेश्वरी , शाम भारती , अजय देशमुख , प्रितेश पाटील आदि जण उपस्थित होते. व आभार नितीन भुतडा यांनी मानले. या शेतकरी मेळाव्याला विदर्भ – मराठवाड्यातुन जनसमुदाय उपस्थित होता.

Google Ad
Google Ad

6 thoughts on “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते पोफाळी साखर पुजन व शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन.

  1. you are truly a just right webmaster The site loading speed is incredible It kind of feels that youre doing any distinctive trick In addition The contents are masterwork you have done a great activity in this matter

  2. Fantastic beat I would like to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear concept

  3. I do trust all the ideas youve presented in your post They are really convincing and will definitely work Nonetheless the posts are too short for newbies May just you please lengthen them a bit from next time Thank you for the post

  4. I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike

  5. I was suggested this web site by my cousin Im not sure whether this post is written by him as no one else know such detailed about my trouble You are incredible Thanks

  6. Simply desire to say your article is as surprising The clearness in your post is simply excellent and i could assume you are an expert on this subject Fine with your permission let me to grab your feed to keep up to date with forthcoming post Thanks a million and please carry on the gratifying work

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!