प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड तालुका संघटक पदी गजानन वानखेडे याची निवड.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या ऊमरखेड तालुका संघटक पदावर गजानन वानखेडे यांची निवड
उमरखेड:
यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणीत गेल्या दोन वर्षापासून पत्रकारिता, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांच्या कामाची पावती म्हणून संघटनेने ऊमरखेड संघटक पदावर निवड करण्यात आली.गजानन वानखेडे मरसुळकर हे पत्रकार संघाच्या नियमांच्या आधीन राहून संघ बळकटीकरिता कार्य करत असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करीत आलेले आहे आणि करतील अशी अपेक्षा संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी व्यक्त केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, व तसेच जि.अध्यक्ष राठोड यांच्या सर्व नु मते उमरखेड तालुका संघटक पदी निवड केली आहे.
पत्रकार गजानन नारायण वानखेडे यांची ऊमरखेड तालुका संघटक पदी निवड झाल्याबद्दल पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय, प्रशासकीय, आधिकाऱ्याकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.