प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ.जालण्याच्या वतीने कोविड युध्दा म्हणून पालकमंत्री व आरोग्य मंत्री.मा.ना.राजेश भैय्या टोपे सन्मानित.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालनाच्या वतीने कोविड योद्धा म्हणून पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री(महाराष्ट्र राज्य) मा.ना.राजेश भैय्या टोपे सन्मानित.
जालना/प्रतिनिधी :दि.1 प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य जालनाच्या वतीने दि.1/11/2020 रोजी जालना जिल्ह्यातील जालना येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जालना जिल्हाध्यक्ष व पत्रकार भगवान धनगे यांच्या पुढाकाराने संस्थापक अध्यक्ष डी.टी आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला. कोवीड १९ आपत्तीमध्ये पोलिस प्रशासन,आरोग्य प्रशासन, पत्रकार संघटना सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती सह विविध स्तरांवर केलेल्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान व्हावा यासाठी कोरोना नियमांचे पालन करून जालन्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री मा. ना.राजेश भैय्या टोपे यांचा ‘कोविड योद्धा’ सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जालना जिल्हाध्यक्ष भगवान धनगे,उपाध्यक्ष तनविर बागवान, live न्युज महाराष्ट्र चे उपसंपादक श्री जगन्नाथ जाधव,पत्रकार दत्ता भोकरे हजर होते.