पुरग्रस्त बा पोशिंद्या तुझ्यासाठी … . . फूल ना, फुलाची पाकळी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 2 1 हजारांचा धनदेश तहसिलदारांकडे सुपुर्द उमरखेड :-

पुरग्रस्त बा पोशिंद्या तुझ्यासाठी … . . फूल ना, फुलाची पाकळी
दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 2 1 हजारांचा धनदेश तहसिलदारांकडे सुपुर्द
उमरखेड :-
मागील दिड महिन्यापासून निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता त्राही भगवान झाल्याने उधवस्त झालेल्या जगाच्या पोशिंद्याला फुल ना फुलाची पाकळी ‘ छोटीसी मदत म्हणून दि . 8 ऑक्टोंबर रोजी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता 2 1 हजार रुपयांचा धनादेश उमरखेड तहसिलदार आर यू सुरडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे .
मागील 15 ऑगस्टपासून लगातार दिड महिना अतिवृष्टीने उमरखेड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकुळ घातल्याने महापूरात शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तसेच बारमाही पिके उध्वस्त झाली आहेत . सर्वसामान्य मजूरवर्ग रोजगाराविना हतबल झाला आहे . अशा दुष्काळी परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उरला नसल्याने शेतकरी नैराश्येच्या गर्तेत सापडला आहे . शासनसह विविध सामाजिक धार्मिक संस्था संघटन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पुढे सरसावला आहे . जगाच्या पोशिंद्याच्या मदतीसाठी आपलाही सहभाग असावा यासाठी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष डॉ विशाल माने , सचिव शैलेश ताजवे , कोषाध्यक्ष निळकंठ धोबे , कार्याध्यक्ष अझरउल्ला खान , वसंतराव देशमुख , लक्ष्मीकांत नंदनवार ,प्रशांत भागवत , साहेबराव धात्रक , अरविंद ओझलवार , अरुण बेले, अजय कानडे अविनाश मुन्नरवार, व्यंकटेश पेंशनवार , रवि भोयर , ताहेर मिर्झा , भिमराव नगारे , सलमान खान, अंकुश पानपट्टे , डॉ शिवचरण हिंगमिरे , संजय देशमुख , संतोष कलाने आदिंनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 2 1 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उमरखेड तहसिलदार आर यू सुरडकर यांना सुपूर्द केला आहे .
jzhcp7