ढाणकी स्मशानभूमीत जीवनांकुर मार्फत वृक्षारोपण उमरखेड -सविता चंद्रे

ढाणकी स्मशानभूमीत जीवनांकुर मार्फत वृक्षारोपण
उमरखेड -सविता चंद्रे
मागील बर्याच वर्षापासून पर्यावरणाच्या संरक्षणार्थ जीवनांकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व देवगिरी वृक्ष भिश,महाराष्ट्रच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून त्यांनी विविध पर्यावरण पूरक भारतीय बहुवार्षिक हजारो वृक्षांची लागवड करुन संगोपण केलेले आहे.तारीख तेरा जुलै दोन हजार पंचेवीस रोजी पर्यावरण संरक्षणार्थ संस्थेच्या वतीने त्यांनी ढाणकी येथील स्मशानभूमीत बहुपयोगी शंभर करवंदाच्या रोपांची लागवड केली.संगोपणाची जबाबदारी मोक्षधाम कमिटीने स्विकारली.
यावेळी सुभाष कुचेरिया कमिटी अध्यक्ष,हरिश्चंद्र चिल्लोरे जीवनांकुर सचिव,सुरेश तुप्तेवार,अतुल येरावार,अमोल तुपेकर,गजानन गंजेवाड,संतोष तिरमकदार अवधूत मोटाळे,अनिल औतकर,अविनाश पदमवार,रामेश्वर लांडगे चव्हाण ,एजमलवार ,दिपक चंद्रे ,उमेश रामधनी,पुंडे आदि वृक्षमित्र उपस्थित होते.
I have been surfing on-line greater than 3 hours today, but I by no means found any attention-grabbing article like yours. It is pretty value sufficient for me. Personally, if all web owners and bloggers made just right content as you did, the internet can be much more helpful than ever before.
I got good info from your blog