पुण्यरथा नगारे आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित.

youtube

पुण्यरथा नगारे आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

उमरखेड…
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागापूर रुपाळा येथील उपक्रमशील शिक्षिका पुण्यरथा विठ्ठल नगारे यांना औरंगाबाद येथील प्रगती बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आजपर्यंतच्या 21 वर्षाच्या शैक्षणिक सेवेत विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम स्वखर्चातून कुठलीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थपणे त्यांनी राबवले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व शारीरिक विकास व्हावा, नागापूर रूपाळ्यासारख्या बहूतांश अंध ,गोंड व बंजारा समाज असणार्या खेड्यातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात येऊन शिकले व टिकले पाहिजेत या उदात्त हेतूने राबवलेल्या नगारे मॅडम यांच्या उपक्रमाची दखल घेत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांनी आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित केले.
या सन्मान सोहळ्यात राज्यभरातील 65 शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांची या पुरस्कार सोहळ्यासाठी निवड झाली होती. प्रगती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सोहळा तसेच राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्जनशील आणि उपक्रमशील शाळा 2022-23 चा पुरस्कार सोहळा मराठवाडा महसूल प्रबोधिनी औरंगाबाद येथे पार पडला . या सोहळ्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण मॅडम , आमदार श्री अतुलजी सावे , राष्ट्राध्यक्ष कोचींग क्लासेस असोसिएशनचे माननीय प्राध्यापक वाघ , जैन इंटरनॅशनल स्कूल चे सचिव जितेंद्र छाजेड, राजीव विनायकराव वाघ जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षण संस्था चालक, श्रीमती गीता कापुरे अध्यक्ष गीता फाउंडेशन, मनोज पांगारकर प्रभारी शैक्षणिक महासंघ भाजपा , बसवराज मंगुरुळे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, श्री बापू घडामोडे माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस ओबीसी मोर्चा , प्रगती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रोहित गिरी व सचिव श्वेता गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा 23 मार्चला औरंगाबाद येथे पार पडला.

Google Ad
Google Ad

1 thought on “पुण्यरथा नगारे आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!