धक्कादायक घटना अज्ञात वाहनाच्या धडकेत चातारी येथील युवकाचा मृत्यू.

youtube

अज्ञात वाहनाच्या धडकेने चातारी येथील युवकाचा मृत्यू

विडूळ ते हरदडा रस्त्यावरची घटना

उमरखेड : –
अज्ञात वाहनाची दुचाकीला समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना विडूळ ते हरदडा या खड्डेमय रस्त्यावर दि . 29 एप्रीलचे रात्री 8 वाजताचे सुमारास घडली आहे .
चंद्रकांत उर्फ सत्यम पंडीतराव पिनलवाड वय अंदाजे 24 वर्ष हा दुचाकी क्र . MH-29 B T 39 78 या वाहनाने उमरखेड येथून चातारीकडे येत असतांना हरदडा ते विडूळ रस्त्या दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनाची दुचाकीला जबरदस्त धडक लागल्याने डोक्याला जबर मार लागलामुळे जागीच ठार झाला . अज्ञात वाहनासह चालक तेथून पसार झाला . रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण झालेल्या सत्यमला पाहून रस्त्याने ये – जा करणाऱ्या वाहन चालकांनी तेथे थांबून रुग्णवाहिका बोलावली व उमरखेड पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावरून पोलीसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला . रुग्णवाहिका आल्यानंतर त्यास उमरखेड शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले . असे अपघात होण्यास खड्डेयुक्त रस्ते कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया घटना स्थळावर नागरिकांनी व्यक्त केल्या या घटनेमुळे चातारी परिसरात शोककळा पसरली आहे . घटनेचा तपास उमरखेड पोलीस करीत आहेत .

Google Ad
Google Ad

1 thought on “धक्कादायक घटना अज्ञात वाहनाच्या धडकेत चातारी येथील युवकाचा मृत्यू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!