ग्राहक मंच हा तक्रार निवारण करणारा मंच आहे तेव्हा शोषणमुक्त समाज झाला पाहिजे प्रा प्रकाश देशमुख

youtube

ग्राहक मंच हा तक्रार निवारण करणारा मंच आहे तेव्हा शोषणमुक्त समाज झाला पाहिजे
प्रा – प्रकाश देशमुख

उमरखेड दि 24 (प्रती )

अभा ग्राहक पंचायतची शाखा उमरखेड ग्राहक पंचायत असून त्यामध्ये ग्राहक मंच हा तक्रार निवारण निवारण करणारा मंच आहे त्यामध्ये आज दिनांक 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात उपस्थित असलेले ग्राहक तथा वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित राहून याच सभागृहात ग्राहकाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उकल होणे आवश्यक असून हाच ग्राहक पंचायतचा उद्देश असून त्यांच्या तक्रारीच्या निवारण करणारा हा मंच आहे व या सर्व तक्रारी सोडवणूक करून हा सर्व समाज शोषण मुक्त असा समाज झाला पाहिजे असे उद्गार उमरखेड तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रा प्रकाश देशमुख यांनी स्थानिक तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन या कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलताना काढले तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विशंभर राणे यावेळी उपस्थित होते तर ग्राहकपंचायतचे कार्याध्यक्ष ॲड विलासराव देवसरकर उपाध्यक्ष राजेश गांजेगावकर दुसरे उपाध्यक्ष दत्ता गंगासागर सचिव आर डी बोरगडे कोशाध्यक्ष यशवंत गिरी पुरवठा अधिकारी अमोल महाजन मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम सरस्वती पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाची सुरुवात जागो ग्राहक जागो या गीताने श्री मुटकुळे यांनी केले पुढे प्रा प्रकाश देशमुख म्हणाले की ग्राहक चळवळीची सुरुवात ही 1986 मध्ये साली ग्राहक कायदा तयार झाला परंतु २० जुलै 20 20 मध्ये सर्व बाबीने सुधारीत कायदा तयार झाला व त्यामुळे टीव्हीवरील येणाऱ्या फसव्या जाहिरातीविरुद्ध सुद्धा जाहिरात करणाऱ्या मोठा सेलिब्रिटी जरी असला तर ग्राहक कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकते परंतु एवढे वर्ष उलटूनही म्हणावे तसे स्वरूप आजही ग्राहक चळवळीला आले नाही आजचा हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम असून आज या उपस्थितीत सर्व ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होऊन या सर्व तक्रारींचा उलगडा झाला तरच आजच्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होईल असे प्रा देशमुख यांनी सांगितले
यावेळी ग्राहकपंचायतचे कार्याध्यक्ष ॲड विलासराव देवसरकर यांनी ग्राहक पंचांच्या आजपर्यंतच्या कामकाजाची माहिती देऊन इतर अनेक प्रश्नांचा उहापोह यावेळी केला तर मागच्या बैठकीत उपस्थित केलेल्या पाणंद रस्त्याच्या प्रश्नावर तहसीलदाराकडून अहवालाची मागणी करण्यात आली तसेच ईसापुर धरणाचे पाणी सोडले असते वेळेवर सुटले असते तर एक महिना उशिरा सोडण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांनी यावेळी आंदोलन करण्याची टाळले सध्या सगळीकडे रस्त्याचे काम सुरू आहे सर्व नागरिक या धुळीमुळे श्वासोसास घेण्यास त्रास होत आहे तसेच दम्याच्या आजार वाढत आहेत बायपास रस्त्याच्या कामाबाबत कॉलेजपर्यंत तो आजपर्यंत का गेला नाही रस्त्याचे काम करीत असताना रस्त्याच्या आजूबाजूचे झाडे कापली जात आहेत बँके मध्ये पासबुक एन्ट्री मिळत नाही प्रिंटर्स बंद आहेत नगरपरिषद पाणी सोडण्याचा प्रश्न विद्युत बिलाच्या असंख्य तक्रारी मीटर बंद पडणे जंगली श्वापदाचे प्रश्न प्राणी येत आहेत शेतीमध्ये नुकसान करत आहेत तसेच एस टी महामंडळचे वाहक सुद्धा चिल्हर पैशासाठी प्रवाशांना त्रास देतात शासकीय अनुदानास नियम बहुतेक खात्यावर पैसे जमा होत नाहीत अर्ज दीर्घकाळ प्रलंबित राहतात माहिती अधिकार 2005 नुसार सेवा प्रक्रिया सेवाकाळ मर्यादा पुस्तिका दर्शनी भागावर असावी अशा विविध प्रश्नांची उत्तरे यावेळी उपस्थित ना तहसीलदार यांना मागितली व अनेक प्रश्नांवर शासनाला विचारणा केली तसेच अशा आशयाचे निवेदन मुळावा येथील ग्राहक पंचायत सदस्य हरिदास इंगोळकर यांनी ग्राहक पंचायत मार्फत ना तहसीलदार विश्वंभर राणे यांना यावेळी दिले यावेळी माजी गटविकास अधिकारी सुभाष पांडे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत विस्तृत अशी माहिती देऊन ग्राहक पंचायत तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करावा लागतो वेगवेगळ्या तक्रारीद्वारे ग्राहकांना कसा फायदा झाला असे अनेक उदाहरणे त्यांनी देऊन ग्राहक आणि ग्राहक चळवळीत अग्रेसर राहून आपली हक्क अबादी त ठेवून लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले तर तहसील कार्यालयाचे ना तहसीलदार विश्वंभर राणे यांनी यावेळी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली तर पांदण रस्त्याचा 75 टक्के प्रश्न रस्ते खुली करण्यात आले ते सांगून 25% रस्त्या करता अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले तहसील मध्ये येणाऱ्या प्रत्येक जणांनी आपला अर्ज विहित नमुन्यात दिल्यास अर्जाचा निकाल लागण्यास वेळ लागणार नाही परंतु त्याप्रमाणे अर्ज देण्यात येत नाहीत ऑनलाईन प्रक्रिया सुधारण्याचा प्रयत्न तसेच पुरवठा विभाग रेकॉर्ड रूम घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न त्यांनी ग वि आ यांचेकडे अर्ज करण्यास सांगितले त्यानंतर तहसील कडे आल्यानंतर आम्ही निपटारा करू असे यावेळी सांगीतले तसेच अनेक ग्राहकांनी विद्युत मंडळाच्या तक्रारी दाखल केल्या सोलर पंपाचे प्रश्न शेतीसाठी लागणारे डी पी ऊस जळाल्या बाबत अनेकांच्या तक्रारी या सर्वांची तक्रारी उपस्थित विद्युत मंडळ अधिकारी सागर विहिरे यांनी या प्रश्नांच्या सोडवणूक केली यावेळी तर वजन मापे विभागाच्या प्रश्न यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य रामराव गायकवाड यांनी उपस्थित केले त्यामध्ये अतिरिक्त वजन मापन करण्याकरता पैसे द्यावे लागतात तसेच प्रमाणपत्र देण्यात येत नाहीत यावेळी ग्राहक पंचायतचे सर्व सदस्य प्रा वि ना कदम रामराव गायकवाड डॉ घोडेकर रंगनाथ आहेर शेखर बंडेवार महिला वर्ग श्री मुटकुळे मजरउल्ला खान गोविंद खंडेलवाल विजय सोनवणे रमेश भागवत चव्हाण सर यांचे सह अनेक विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते संचलन व आभार प्रदर्शन संदीप घाडगे यांनी केले

Google Ad
Google Ad

1 thought on “ग्राहक मंच हा तक्रार निवारण करणारा मंच आहे तेव्हा शोषणमुक्त समाज झाला पाहिजे प्रा प्रकाश देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!