भारतातल्या राज्यकर्त्यांना माणसाचा मुळीच कळवळा नाही – राज ठाकरे

youtube

भारतातल्या राज्यकर्त्यांना माणसाचा मुळीच कळवळा नाही – राज ठाकरे

उमरखेड –
विदर्भातल्या वाढत्या शेतकऱ्यांचा चिंताजनक निरंतर आत्महत्या मुळे त्यांच्या पश्चात तील कुटुंबाचे जगण्याचे जीवनमान बेहालिचे झाल्यामुळे त्याची किंमत त्यांना कोणा समजली नसेल ‘ बाहेरच्या देशात श्वानाची जेवढी काळजी घेतली जाते , मात्र भारतात माणसाची काळजी घेतली जात नाही ‘ त्यामुळे जणू माणसाचा जिव्हाळा च मरण पावला आहे असे विदारक चित्र आणि वाईट अवस्था निर्माण झालेली आपल्याला देशात दिसत आहे
लहान मुलीवर बलात्कारा सारखे प्रकार वाढीस लागले असुन त्यामुळे महिला सुरक्षित नाहीत राजकारणी मात्र या सर्व बाबीला बगल देत पाणी , वीज, दूध यांचा भाव ठरावितात आणि निवडणुका हा खेळ समजुन अनेक प्रलोभने देऊन निघून जातात यांना मागील प्रश्ने जनतेनी अवश्यक विचारली पाहिजे रस्ते खड्यात की , खड्डे रस्त्यात ही विकासाची वाईट अवस्था निर्माण झाली आहे नाशिक मध्ये रस्ते बांधणी साठी कंत्राटदारा कडून टक्केवारी घेतल्या गेली नाही त्यामुळेच तयार केलेली रस्ते दीर्घाकाळ टिकणारी बनविल्या गेली आहे हे महाराष्ट्र नवं निर्माण सेनेच्या कार्य कर्तृत्वाची आजही सर्वांना दिसती पावती आहे तरुण – तरुणांना मध्ये कसलीच कमतरता नाही परंतु राज्याकर्त्यांच्या मेंदूत कमतरता अधिक असल्याने हे सर्व काही घडत आहे असा शाब्दिक हल्लाबोल महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ९ नोव्हेंबर शनिवार रोजी पक्षातून दिलेले उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्या उमरखेड प्रचार सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित करताना बोलले.
महाराष्ट्र नवं निर्माण सेनेने राज्याला दीर्घ कालीन विकासाचं व्हिजन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच उज्वल भविष्य करण्यासाठी मूळ स्वप्न केलेलं असुन या बाबतीत त्या पद्धतीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वच पक्षाला बाजूला सारून जागरूक व तरुण युवकांनी बाकी राज्यकर्त्यांना बाजूला सारून महाराष्ट्र नवं निर्माण सेनेला सतेत बसवा म्हणजे महाराष्ट्र राज्याचे विकास व्हिजन स्वप्न पूर्णतःवास येईल असे सरते शेवटी पक्ष अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
या सभेला आनंद एम्बडवार, देवा शिवरामवर, अभय गडम देविदास शहाणे, सादिक शेख, संजय बिजोरे, अमोल जगताप,पुसदचे उमेदवार अश्विन जयस्वाल, मोन्टेसिघ जहागीरदार, कृष्णराव नरवाडे, सुधा ठाकूर, संगीता घोडमारे, अभिजित नानवटकर हे सर्व जण सभेला प्रामुख्याने उपस्थित होते.

सोबत –
सभेचा फोटो जोडला आहे

Google Ad
Google Ad

9 thoughts on “भारतातल्या राज्यकर्त्यांना माणसाचा मुळीच कळवळा नाही – राज ठाकरे

  1. “Remarkable piece of content! Your expert analysis and clear communication make complex concepts easy to grasp. This is definitely going in my bookmarks.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!