राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट महागाव

राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट
महागाव
: राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरीभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे, नॅचरल शुगर युनिटचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
राज्यपालांनी नॅचरल शुगर युनिट मधील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन तेथील विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली. तसेच युनिटची पाहणी केली. तसेच युनिटच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आ.वानखडे, युनिटच्या अध्यक्षांसह उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, पोलिस अधिकारी श्री.ठोंबरे, महागावचे तहसीलदार अभय मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम आदी उपस्थित होते.
नॅचरल शुगर युनिटच्या भेटीनंतर राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी गुंज येथून नांदेडकडे प्रस्थान केले.