शिक्षणामुळे सर्वांगीण विकास साधता येतो हेच अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत होते – राजु गायकवाड.
शिक्षणामुळे सर्वांगीण विकास साधता येतो हेच अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत होते – राजु गायकवाड
प्रतिनिधी
उमरखेड : समाजातील मुले व मुली शिक्षितच नव्हे तर उच्च शिक्षित कसे होतील यासाठी आई – वडिलांनी विशेष लक्ष्य देऊन त्यांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे . मुले शिक्षणामुळे समृद्ध झाली तरच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल हेच अण्णाभाऊ साठे याना अभिप्रेत होते .असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजु गायकवाड यांनी केले . ते तालुक्यातील साखरा येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शामराव वानखेडे हे होते . याप्रसंगी प्रा . अनिल काळबांडे म्हणाले , मराठी साहित्य ज्या वेळेस रंजनवाद व धार्मिक वादात होते त्यावेळेस अण्णाभाऊ साठे कामगारांचे व कष्टकऱ्यांचे प्रश्न आपल्या लिखाणातून मांडून त्याना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते . सामाजिक कार्यकर्त्या साईली शिंदे यांनी , अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाने अंमलात आणावे असे सांगीतले . तर पत्रकार दत्तराव काळे यांनी समाजाला एकसंघ राहण्याचे आवाहन केले . याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाईकराव , राहूल काळबांडे , सुधाकर कांबळे यांनी ही आपले विचार व्यक्त केले . या कार्यक्रमासाठी अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सुरेश हिंगडे ,तुकाराम हिंगडे, विश्वनाथ हिंगडे, दत्तराव हिंगडे ,हरिभाऊ हिंगडे, लक्ष्मण हिंगडे, संदीप हिंगडे , कृष्णा हिंगडे, अशोक हिंगडे, पिंटू हिंगडे, पांडुरंग हिंगडे, साईप्रसाद हिंगडे, भीमराव हिंगडे, जयराम हिंगडे, चांदराव हिंगडे , विठ्ठल वंजारे ,नामदेव हिंगडे,अशोक काळे, दिलीप धाडे,दीपक भांडवले, संभा हिंगडे, श्रीधर हिंगडे ,दिलीप हिंगडे, विजय हिंगडे, अजय हिंगडे , नारायण हिंगाडे यांनी मेहनत घेतली . सूत्रसंचालन चांदराव बनसोडे तर आभार उत्तम हिंगडे यांनी केले .