बस वेळेवर येत नसल्याने शालेय विद्यार्थिनीची पायपीट.
बस वेळेवर येत नसल्याने शालेय विद्यार्थिनीची पायपीट
हिंगोली –
हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठीजाणाऱ्या शालेय विद्यार्थिनी ना करंजाळा नागझरी भोशी येथून लोहगावला यावे लागते. हिंगोली बस आगाराची बस मात्र लोहगाव तसेच डिग्रस कऱ्हाळे येथील शाळा सुटण्याचा टाईमला येत नसल्याने. हिंगोली तालुक्यातील लोहगाव तसेच डिग्रस कऱ्हाळे येथील शालेय विद्यार्थिनीची मोठी गैरसोय होत आहे.
शालेय मुलींचे गैरसोय होऊ नये म्हणून हिंगोली एस टी आगार प्रमुखांनी बस फेऱ्या पाठवाव्यात अशी मागणी विद्यार्थिनी कडून व विद्यार्थिनीच्या पालका कडून होत आहे. बस वेळेवर येत नसल्याने अनेक वेळा या मुलींना पावसात भिजत जावे लागते.
तसेच उन्हातानात पण भोशी. करंजाळा. नागझरी. तसेच डिग्रस कऱ्हाळे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या संतुक पिंपरी लिंबाळा येथील मुलींना सुद्धा बस वेळेवर येत नसल्याने पाईच जावे लागते. मुलींना शाळेत जाण्यासाठी वेळेवर बस फेऱ्या वाढवल्या तर मुलींचे गैरसोय दूर होईल. तरी संबंधित आगार प्रमुखांनी हिंगोली ते भोशी ,भोशी ते हिंगोली या बस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.