धनज च्या शेतकऱ्यांची कन्या आरती साबळे यांची कृषी अधिकारी पदी निवड.

youtube

धनज च्या शेतकऱ्यांची कन्या आरती साबळे यांची कृषी अधिकारी पदी निवड
२७ ऑगस्ट
उमरखेड –
तालुक्यातील धनज या कमी लोकसंख्या असलेल्या खेड्यातील रहिवासी आरती डिगाबंर साबळे या तरुणीची गणना करावी लागेल येथील आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गांवातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, तर जवाहरलाल नवोदय विद्यालय घाटंजी यवतमाळ येथे माध्यमिक ,तर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अमरावती येथील पदवीचे शिक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्ग दोन च्या तालुका कृषी अधिकारी पदापर्यंत आरती ने झेप घेतली आणि ती कृषि अधिकारी म्हणून निवड पात्र ठरली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात आरती दिगाबंर साबळे यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे गावात सुविधा नसताना आरतीने अत्यंत चिकाटीने आपले ध्येय पूर्ण केले .एक वेळा महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षेत अपयश आले परंतु ध्येय गाठण्याच्या जिद्दीमुळे आरतीने आखेर महाराष्ट्र कृषी सेवा आयोगाच्या २०२२ च्या अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून चौथी रँक मिळवली आहे .कृषी अधिकारी पदी निवड झालेली आरती दिगाबंर साबळे ह्या या पदी पोहोचलेल्या गावातून एकमेव उमेदवार आहेत
शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक हितोपयोगी कार्य करण्याचा मानस आरती यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केला .आई वडील माझे सगळ्यात मोठे प्रेरणास्थान आहेत. ज्यांनी पदोपदी माझ्या प्रत्येक प्रयत्नाला मोलाची साथ दिली. त्यामुळे या यशाचे मानकरी माझे आई वडील आणि माझा भाऊ व शिक्षक आहेत असे सांगितले गावातील सर्व स्तरावरून आरती साबळे यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!