हिंगोलीतून भाजपाच्या सुमठाणकर यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल.

youtube

हिंगोलीतून भाजपाच्या सुमठाणकर यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल.

उमरखेड :

दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 26 एप्रिल रोजी होणाऱ्या हिंगोली लोकसभा निवडणुकी साठी नामांकन अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजपा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपला अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केला असून सुमठाणकर यांच्या दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामुळे महायुतीला बंडखोरीची लागण लागल्याचे दिसून येत असून दिनांक 3 एप्रिल रोजी भाजपा मराठवाडा आध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक योगी श्याम भारती महाराज यांनी देखील आपला नामांकन अर्ज दाखल केला या दोघांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून दाखल केलेल्या उमेदवारीमुळे महायुतीतील शिवसेनेच्या बाबुराव पाटील कदम यांच्यापुढे नवा पेच निर्माण झाल्याचे दिसत असून नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत भाजपा पक्षश्रेष्ठी रामदास पाटील सुमठाणकर व योगी शाम भारती महाराज यांना नामांकन अर्ज मागे घेण्यास कशा पद्धतीने भाग पाडते यावर शिवसेनेसह महायुतीतील कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्याचे दिसत आहे 

Google Ad
Google Ad

1 thought on “हिंगोलीतून भाजपाच्या सुमठाणकर यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल.

  1. This website is an absolute gem! The content is incredibly well-researched, engaging, and valuable. I particularly enjoyed the [specific section] which provided unique insights I haven’t found elsewhere. Keep up the amazing work!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!