परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – राम देवसरकर.

youtube

परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध
– राम देवसरकर

उमरखेड :-
या परिसरातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात नेहमीच यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्था व गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय पुढाकार घेऊन अनेक उपक्रम राबवत आले आहे. युवकांचे करीअर घडवून सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठीच आजची ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमध्ये युवक-युवतींना नोकरी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांनी केले. येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय ‘करीअर व रोजगार मार्गदर्शन’ कार्यशाळेत उपस्थित युवकांना आपली भूमिका मांडत मार्गदर्शन करताना बोलत होते.
‘करीअर ॲंड प्लेसमेंट टिम’चे योगेश वनकर, रवींद्र मिसाळ, प्रा. ॲलन अब्राहम,प्रा.मारोती आलट प्रा. मेहेर लालवाणी मॅडम, अभिजीत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे आणि यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य राम देवसरकर, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत कार्यशाळेला उपस्थित होते.
‘करीअर ॲंड प्लेसमेंट टिम’ने उपस्थित युवकांना स्व परिचय पत्र तयार करण्याचे कौशल्य, मुलाखतीचे कौशल्य, समूह चर्चा, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायक विषयांवर मार्गदर्शन केले. या टीमचे सदस्य रवींद्र मिसाळ यांनी ‘माझे करीअर, माझी ओळख’ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व कौशल्य’ या विषयावर प्रा. मेहेर लालवाणी मॅडम यांनी मार्गदर्शन केले. प्रा. ॲलन अब्राहम यांनी मुलाखतीची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी यशाचा दरवाजा कसा उघडावा, याबद्दल मार्गदर्शन केले.
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने संस्थेचे माजी अध्यक्ष लोकनेते कै. अनंतराव देवसरकर आणि गावंडे महाविद्यालयाचे संजीवक कै. डॉ. आत्मारामजी गावंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनीही विद्यार्थी युवकांना करीअर व रोजगार विषयक मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गावाची सेवा करण्यासाठी, सामाजिक कार्य करण्यासाठी मी नोकरीचा राजीनामा देऊन गावाकडे परत आलो. या परिसरातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तयारी करावी. त्याकरिता क्वालिटी आणि क्वांटिटी आवश्यक आहे. हे लक्षात घ्यावे.
या कार्यशाळेला परिसरातील शिक्षण, सहकार, राजकारण, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे सूत्र संचालन व आभारप्रदर्शन प्रा. अभय जोशी, प्रा. एस. पी. चिंचोलकर, प्रा. डॉ. एस. ए. धोंगडे यांनी केले.
उमरखेड , महागावसह परिसरातील ७०० विद्यार्थी युवकांनी लाभ घेतलेल्या या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी गावंडे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. मारोती आलट आणि प्रा. योगेश वनकर यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात प्लेसमेंट कक्षाचे समन्वयक प्रा. आय. वाय. खान, प्रा. डॉ. पी. डी. शिरभाते यांच्यासह प्रा. डॉ. व्ही. पी. कदम, प्रा. डॉ. डी. व्ही. तायडे, प्रा. डॉ. एस. आर. वद्राबादे, प्रा. पी. एम. गुजर प्रा. बी. यु. लाभसेटवार, यांनी परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!