चातारी ग्रामपंचायत अज्ञाताने जाळली ; संगनकासह दस्ताऐवज जळुन खाक.

youtube

चातारी ग्रामपंचायत अज्ञाताने जाळली ; संगनकासह दस्ताऐवज जळुन खाक

२६ सप्टेंबर
उमरखेड –
तालुक्यातील चातारी येथील ग्रामपंचायत अज्ञाताने जाळून टाकल्याची घटना २५ सप्टेंबर ला रात्रीला घडली या मध्ये ग्राम पंचायत मधील दस्ताऐवज जळुन खाक झाले असल्याने हि बाब गांवच्या ग्रामपंचायत सचिवास माहित होताच या बाबत उमरखेड पोलीसात घटनेची फिर्याद दाखल केल्या वरुन पोलासांनी या घटने प्रकरणी संदर्भात गुन्हा दाखल केला आहे
या घटनेत कार्यालयातील दप्तर , टेबल , लोखंडी कपाट , लॅपटॉप , जन्म मुत्यू सन १९६२ मधील ४ बुक, न . न १० , ५ बुक, फेरफार फाईल व माहीती अधिकार फाईल व जुने दस्ताऐवज नष्ट झाले व साहित्य संपती जळाली त्यामुळे मोठे नुकसान झाले हे सर्व प्रकार करण्याच्या उदेशाने अज्ञात व्यक्तीने रात्री च्या वेळी कार्यालया चे कुलूप तोडून कार्यालय जाळून टाकले असल्याची तक्रार चातारी ग्रामपंचायत चे सचिव प्रकाश राठोड यांनी उमरखेड पोलीस स्टेशन २६ रोजी दिली आहे ग्रामपंचायतचे काम २५ सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्या नंतर शिपाई समाधान माने यांनी स्वःत ५ वा सायंकाळी कुलूप लावून कार्यालय बंद करण्यात आले होते . त्यानंतर रात्रीला पाऊस जास्त आल्यामुळे संतोष जाधव यांच्या घरामध्ये पाणी जास्त आल्यामुळे त्यांना राहन्या करिता अंगनवाडी ची चाबी घेन्या करिता रात्री १० वाजता शिपाई समाधान माने पाणी पुरवठा कर्मचारी राजेश लक्षरवाड यांनी अंगनवाडी चाबी घेऊन रात्री १० वाजता कार्यालय बंद केले अशी माहिती फिर्यादी मध्ये ग्राम सेवक राठोड यांनी लेखी दिलेल्या फिर्यादी मध्ये नमुद केले आहे
त्यानंतर सकाळी दरवाजा उघडा असलेला सकाळी ६ वाजता शिपाई समाधान माने यांना दिसला आणि कार्यालयातील दस्ताऐवज साहित्य जळत असलेले निदर्शनात आले या बाबतीत तत्काळ माहिती शिपायाने सचिव प्रकाश राठोड यांना सागीतली सचिव यांनी स्वत : दाखल होऊन परिस्थीती पाहणी केली आणि घटनेची रितसर तक्रार उमरखेड पोलीसात दिली त्यावरून पोलीसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवि ४५४ , ४५७ , ४३६ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे

चौकट

ग्राम पंचायत चातारी येथील दस्ता ऐवज नष्ट करन्याच्या हेतूने २५ सप्टेंबर च्या रात्रीला अज्ञाताने ग्राम पंचायत ला आग लावली आगीत दस्ताऐवज खाक झाले.असे नागरिकाकडुन चर्चा होत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!