राशीवर उभी झालेल्या महालक्ष्मी प्रगटल्याच्या प्रकरणाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भंडाफोड, ठाणेदार तहसीलदारांच्या उपस्थितीत देवीचे विसर्जन

youtube

राशीवर उभी झालेल्या महालक्ष्मी प्रगटल्याच्या प्रकरणाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भंडाफोड, ठाणेदार तहसीलदारांच्या उपस्थितीत देवीचे विसर्जन

दारव्हा –

शहरातील अंबिका नगर परिसरात राशीवरील महालक्ष्मी उभी झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती या प्रकरणाचा सोमवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भंडाफोड केला. यावेळी ठाणेदार तहसीलदारांच्या उपस्थितीत देवीचे विधिवत विसर्जन करण्यात आले तसेच नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले. अंबिका नगरात राहणाऱ्या सौ, मंगला बाळू इंगोले यांच्या घरी गुरुवारी रात्री दहा वाजता राशीवर बसवलेली महालक्ष्मी उभी झाल्याची चर्चा करण्यातआली होती. ही चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात देणगी सुद्धा जमा करण्यात आली होती. परंतु महालक्ष्मी देवीचे तीन दिवसानंतर विसर्जन झाल्यावरही सदर प्रकार असाच चालू होता. याबाबतीत काही सुज्ञ नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कानावर ही बाब टाकली असता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाशआंबिलकर जिल्हा कार्याध्यक्ष , अंधश्रद्धा निर्मुलन समिती,महाराष्ट्र राज्य,पवन भारस्कर जिल्हा सचिव.अंधश्रद्धा निर्मुलन समिती,महाराष्ट्र राज्य, यांनी ठाणेदार विलास कुलकर्णी, तहसीलदार विठ्ठल कुमरे, तसेच शहरातील पत्रकार यांच्या उपस्थितीत घटनास्थळावर भेट देऊन सदर प्रकरण खोटे असल्याचा भंडाफोड केला. लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळ करून सदर प्रकार करण्यात आला असल्याचे यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्वांच्या समोर सिद्ध केले. तसेच महालक्ष्मी देवीचे ठाणेदार तहसीलदार यांच्या उपस्थितीत शेजारच्या महिला बोलावून विधीवत पूजाअर्चा करून विसर्जन करण्यात आले. तसेच नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!